ATM फ्रॉड वाढले; एका वर्षात १४९ कोटींचा गंडा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, December 11, 2019

ATM फ्रॉड वाढले; एका वर्षात १४९ कोटींचा गंडा

https://ift.tt/2rzbYsg
मुंबई : एटीएम फ्रॉड, नेट बँकिंग आणि डेबिट कार्डसारख्या फसवणुकीच्या घटनांमध्ये ५० टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१८-१९ या वर्षात फ्रॉडमधून ग्राहकांची तब्बल १४९ कोटींची फसवणूक झाली आहे. दिल्लीत सर्वाधिक फ्रॉड झाल्याचे दिसून आले आहे. देशातील एकूण फ्रॉडपैकी २७ टक्के घटना एकट्या दिल्लीत घडल्या आहेत. सध्या सुरु असलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशात ही माहिती समोर आली. फसवणुकीच्या घटना वाढल्या असल्या तरी त्यातील नुकसानीची रक्कम कमी झाली आहे. २०१७-१८ या वर्षात एटीएम फ्रॉड, नेट बँकिंग आणि डेबिट कार्डसारख्या फसवणुकीच्या घटनांमध्ये १६९ कोटींची फसवणूक झाली होती. ग्राहकांच्या खात्यात डल्ला मारण्यासाठी हॅकर्स 'एटीएम'ला टार्गेट करत आहेत. मागील वर्षात एटीएमच्या माध्यमातून झालेल्या फ्रॉडची संख्या सर्वाधिक आहे. त्यातील सार्वजनिक बॅंकांशी संबंधित एटीएममधील फसवणुकीच्या घटना लक्षणीय आहेत. एटीएम सुरक्षेसंबंधी रिझर्व्ह बँकेने बँकांना मार्गदर्शक प्रणाली जारी केली आहे. मात्र हॅकर्स विविध पद्धतींचा वापर करून कार्डचा करित आहेत. त्यामुळे एटीएम,नेट बँकिंगसारख्या प्रणालीच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षात झालेल्या फ्रॉडबाबत सरकारने कोणतेही कारण दिलेले नाही. इतर देशांतील नागरिकांच्या माध्यमातून एटीएम फ्रॉड झपाट्याने वाढत असल्याचे बँकर्सचे म्हणणे आहे. दरम्यान, बँकांनी आपली सुरक्षा प्रणाली मजबूत करण्यासाठी ठोस पावले उचलणे आवश्यक्य आहे, असेही मत व्यक्त करण्यात आले आहे. SBI आणि IDBI 'एटीएम'शी संबंधित घटना वाढल्या मार्च २०१९ पर्यंतच्या आकडेवारीनुसार देशभरात स्टेट बँकेचे ५८ हजार एटीएम होते. दोन लाखांच्या रोकड संबधीच्या फ्रॉडमध्ये प्रत्येक ५ फ्रॉडपैकी १ फ्रॉड एटीएमशी संबंधित आहे. त्याचबरोबर आयडीबीआय बँकेच्या एटीएमशी संबधित फसवणुकीच्या घटना वाढल्या आहेत. आयडीबीआयच्या वेबसाईटनुसार देशभरात बँकेची ३ हजार ७०० एटीएम आहेत. गेल्या वर्षात बँकेकडे एटीएममधील १८०० फसवणुकीच्या फ्रॉडची नोंद करण्यात आली. एप्रिल २०१७ ते २०१९ या कालावधीत एकूण एटीएम फ्रॉडपैकी १५ टक्के फ्रॉड हे केवळ आयडीबीआय बँकेच्या एटीएमशी संबंधित होते.