नसीरुद्दीन शाहांच्या मुलीविरुद्ध गुन्हा दाखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, January 26, 2020

नसीरुद्दीन शाहांच्या मुलीविरुद्ध गुन्हा दाखल

https://ift.tt/2GAztoV
मुंबई- बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शहा यांची मुलगी हीबा शहाविरोधात मुंबईच्या वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली आहे. १६ जानेवारीला एका पशुवैद्यकीय दवाखान्यात दोन कर्मचाऱ्यांना मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. सध्या याच सीसीटीव्हीचे फुटेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली असून पुढील चौकशी सुरू केली आहे. पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार, १६ जानेवारीला हीबा शाह त्यांच्या मैत्रिणीच्या दोन मांजरींची नसबंदी करण्यासाठी गेल्या होत्या. मात्र काही कारणांमुळे नसबंदी होऊ शकली नाही. कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या दिवशी दवाखान्यात सर्जरीचं काम सुरू होतं, त्यामुळे नसबंदी होऊ शकली नाही. मांजरांची नसबंदी होऊ न शकल्यामुळे हीबा यांना राग आला आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना मारहाण केली. मीडिया रिपोर्टनुसार, दवाखान्याच्या कर्मचाऱ्यांनी तक्रारीत म्हटलं की, हीबा त्यांना म्हणाली की, त्यांना माहीत नाही ती कोण आहे. एवढावेळ तुम्ही मला ताटकळत कसं ठेवू शकता. माझी मदत कोणी का करत नाही. मांजरांचा पिंजरा रिक्षातून उतरवतानाही कोणी माझी मदत केली नाही. पोलिसांनी हीबाविरोधात तक्रार नोंदवून घेतली आहे. हीबा यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्यावर केलेले आरोप निरर्थक असल्याचं सांगितलं. हीबा म्हणाल्या की, त्यांनी कोणालाही मारहाण केलेली नाही. याउलट सुरुवातीला गेटकिपरने मला दवाखान्यात जाऊ दिलं नाही आणि मला विचीत्र प्रश्न विचारू लागले. एवढंच नाही तर एका महिला कर्मचारीने मला धक्काबुक्की केली.