
नवी दिल्लीः विषाणू आता जगभरात पसरत चालला आहे. युरोपातील देशांत यामुळे भीतीचे वातावरण आहे. याचा परिणाम म्हणून मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स सलग सहाव्या दिवशी कोसळला आहे. सेन्सेक्स १००० अंक खाली येत ३८,७०४ अंकावर येऊन स्थिरावला आहे. तर निफ्टी ३०० अंक खाली येत ११,३३३ वर स्थिरावला. टाटा स्टील, टाटा महिंद्रा, बजाज फायनान्स, इन्फोसिस, महिंद्रा अँड महिंद्रा आणि ओएनजीसी या कंपन्यांचे समभाग ५.३१ टक्क्यांपर्यंत पडले आहेत. जगभरात करोना विषाणूग्रस्तांची संख्या तब्बल ८१ हजार झाली आहे. त्यातच डेरिव्हेटिव्ह कंत्राटांची मुदतपूर्ती आज, शुक्रवारी होणार आहे. चीनमधून येणाऱ्या मालाची आवक थांबली आहे. त्यामुळे बाजारावर विपरित परिणाम होत आहे.