
नवी दिल्लीः ईशान्य दिल्लीत उसळलेल्या भीषण दंगलीत जीव गमावलेल्यांची संख्या आता ३८ वर पोहोचली असून ३६४ जण जखमी झाले आहेत. दरम्यान, आयबी या गुप्तचर यंत्रणेचे कर्मचारी अंकित शर्मा यांचा नाल्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर गुरुवारी गोकुळपुरी येथील गंगा विहार जंक्शन परिसरातील नाल्यातून आणखी दोन मृतदेह बाहेर काढण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहेत. या घटनेनंतर इशान्य दिल्लीतील बंदिस्त नाल्यात मृतदेहांचा शोध घेत आहेत. नाल्यात घेतायेत शोध पाटबंधारे व पूर नियंत्रण विभागाचे कर्मचारी अनिल त्यागी यांनी गुरुवारी नाल्यातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर एक मृतदेह तरंगताना दिसला. मृतदेहाबाबत माहिती मिळाल्यानंतर त्वरित लोकांनी एकच गर्दी केली होती. मात्र, त्या परिसरात कर्फ्यू असल्यामुळं, जमलेली गर्दी लगेच हटवण्यात आली व मृतदेह बाहेर काढण्यात आला. असं अनिल त्यागी यांनी सांगितलं. मृतदेहाची ओळख अद्याप स्पष्ट झाली नाही दोन्ही मृतदेह गुरुवारी सकाळी ११च्या दरम्यान आढळले असून अद्याप त्यांची ओळख पटलेली नाही. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, नाल्यातून बाहेर काढलेला मृतदेह हा तिथला मूळ रहिवासी नसल्याचं स्पष्ट केलं आहे. हॉस्पिटलमध्ये सापडला मृतदेह चांदबाग येथील नाल्यातून मुर्शरफची मृतदेह बाहेर काढण्यात आला होता. मुर्शरफच्या कुटुंबीयांनी दंगल भडकल्यानंतर अनेक ठिकाणी त्याचा शोध घेतला. काही परिचीत व्यक्तींनी कोणीतरी मुर्शरफला नाल्यात फेकले असल्याची माहिती दिली. पण, कुटुंबीयांना त्याचा तपास करणं कठिण होतं म्हणून शेवटचा पर्याय म्हणून ते रुग्णालयात गेले. मात्रस तिथं त्यानं मुर्शरफचा मृतदेह सापडला. मारहाण करुन नाल्यात फेकलं मुर्शरफप्रमाणेच मोहशीन या तरुणाचा मृतदेह नाल्यातून बाहेर काढण्यात आला आहे. मंगळवारी मोहसीन कामानिमित्त घराबाहेर पडला होता. दंगल भडकलेल्या भागात आल्यानंतर काही जणांनी त्याच्या कारला घेराव घातला व त्याला पँट काढण्याची जबरदस्ती केली. याचदरम्यान त्यानं मदतीसाठी त्याच्या मित्राला फोन केला. मात्र, त्याला वाचवण्यासाठी कोणी येणार तोपर्यंत त्याला मारहाण करुन नाल्यात फेकण्यात आलं.