गुन्हेगारांसोबतचा फोटो व्हायरल; गृहमंत्र्यांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, February 2, 2021

गुन्हेगारांसोबतचा फोटो व्हायरल; गृहमंत्र्यांनी दिलं 'हे' स्पष्टीकरण

https://ift.tt/2NXzB8N
औरंगाबादः राज्याचे गृहमंत्री सध्या एका फोटोमुळं चांगलेच चर्चेत आले आहेत. या फोटोच गृहमंत्र्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या तिघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अनिल देशमुख दौऱ्यावर असतानाचा हा फोटो आहे. हा फोटो व्हायरस झाल्यानंतर गृहमंत्र्यांना विरोधकांनी घेरलं आहे. अखेर या प्रकरणावर अनिल देशमुखांनी स्पष्टीकरण दिलं आहे. अनिल देशमुखांचा गुन्हेगारांसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडले आहे, त्यानंतर अनिल देशमुखांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी औरंगाबादला दौऱ्यावर होतो. दौऱ्यावर असताना हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात, अशावेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची माहिती नसते. पण यापुढे अवश्य दक्ष राहिन, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे. वाचाः कोण आहेत हे तिन गुन्हेगार ? गृहमंत्र्यांच्यासोबत व्हायरल होणाऱ्या फोटोतील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत. तर, एकाची एमआयएमनं पक्षातून हकालपट्टी केली असून तिघांवर शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर अशी त्यांची नावं आहेत. वाचाः सय्यद मतीन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो जेलमध्ये होता तर, कलीम कुरेशीची ओळख शहरात गुटखा किंग म्हणून आहे. जफर बिल्डरवर ट्रक चोरुन त्याचे सुटे भाग करुन विल्हेवाट लावण्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे. चित्रा वाघ यांची टीका दरम्यान, गृहमंत्र्यांच्या या फोटोवरुन भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी जोरदार टीका केली आहे. एक ट्विट करत त्यांनी ‘हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक', असं म्हणत गृहमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. 'बलात्कारी व गुन्हेगारांना “शक्ती” देण्याची मोहीमच जणू गृहमंत्र्यांनी उघडलीये. अन्याय अत्याचारग्रस्त महिलांची भेट घेण्यास त्यांचे सात्वंन करण्यास गृहमंत्र्यांना वेळ नाही पण गुन्हेगारांना बलात्काऱ्यांना बळ देण्यास मात्र तत्पर… ‘हे कसले रक्षक हे तर नराधमांना पाठीशी घालणारे भक्षक,' असं त्यांनी म्हटलं आहे.