४०० फूट खोल दरीत कोसळणारी कार झाडावर अडकली - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, June 18, 2021

४०० फूट खोल दरीत कोसळणारी कार झाडावर अडकली

https://ift.tt/3zBLWmv
सातारा: वाईहून पाचगणीला जाणारी कार पसरणी घाटात जाताना झाला. दरम्यान यात मोठा अनर्थ टळला. चालकांच्या वळण लक्षात न आल्यामुळे रस्त्याच्या संरक्षक कठड्यावरुन कार दरीत जात होती. काही फूट अंतरावर कोसळताना झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा तीन-चारशे फूट खोल दरीत कोसळली असती. मोटारीसह सर्व जण सुरक्षित आहेत. (the car stuck into a tree while crashing into a 400 feet deep ravine) पुण्याहून पाचगणीला राहण्यासाठी स्थानिक कुलीन ठक्कर व त्यांचे कुटुंबीय आले होते. काही कामानिमित्त ते आज वाईला आले होते. वाईतील कामे संपवून पसरणी घाटातून पाचगणीला जात असताना सोळा नंबर स्टॉपजवळ त्यांची मोटार संरक्षक कठड्यावर चढून दरीच्या बाजूला घुसली. मात्र ती काही फूट अंतरावर असणाऱ्या झाडात अडकल्यामुळे एक पुरुष व दोन महिलांचे प्राण वाचले. क्लिक करा आणि वाचा- मोटार क्रमांक (एमएच १२ ओ टी ६६७२) मोटार दुपारी वाईहून पाचगणीकडे निघाली होती. पसरणी घाटातून पाचगणीकडे जात असताना मुसळधार पाऊस आणि घाटातील धोक्यामुळे वाहन चालकाला रस्त्यावरील वळण लक्षात न आल्याने मोटार रस्त्यावरील संरक्षक कड्यावर चढून दरीत घुसली. काही फूट अंतर जाताच झाडाला अडकल्याने गाडीतील सर्वांचे प्राण वाचले. क्लिक करा आणि वाचा- मोटारीचे किरकोळ नुकसान झाले. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. ही माहिती मिळताच वाई पोलिसांनी तात्काळ पसरणी घाटात धाव घेतली. क्रेनच्या साह्याने मोटार बाहेर काढण्यात आली. अपघाताची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे. क्लिक करा आणि वाचा-