WTC फायनलच्या दुसऱ्या दिवशी सर्वात जास्त सर्च होणार ही गोष्ट, कोणती तुम्हीही जाणून घ्या.... - Times of Maharashtra

ठळक बातम्या

  

Saturday, June 19, 2021

demo-image

WTC फायनलच्या दुसऱ्या दिवशी सर्वात जास्त सर्च होणार ही गोष्ट, कोणती तुम्हीही जाणून घ्या....

https://ift.tt/3q7hTyB
photo-83647883
साऊदम्पटन : फायनलचा पहिल्या दिवशी टॉसही होऊ शकला नाही. त्यामुळे आता सामन्याच्या दुसऱ्या दिवसाची उत्सुकता चाहत्यांना असेल. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वात जास्त एक गोष्ट नक्की सर्च केली जाणार आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशी पाऊस कधी थांबणार आणि लढत कधी पाहायला मिळणार, याची उत्सुकता चाहत्यांना होती. आता सामन्याच्या दुसऱ्या दिवशी सर्वात जास्त उत्सुकता असेल ती नेमंक हवामान कसं असेल. कारण पावसावर सामन्याचा दुसरा दिवसही अवलंबून असणार आहे. त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी साऊदम्टनमध्ये हवामान कसं असेल, पावसाची शक्यता किती आहे, याचा अंदाज चाहते घेतील. त्यामुळे सामन्याच्या दुसऱ्या दिवशी हवामान कसं असेल हे सर्वात जास्त सर्च केले जाण्याची शक्यत आहे. हवामान खात्याने नेमकं काय सांगितलं आहे, पाहा... पहिल्या दिवशी पावसाची ९० टक्के शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार पहिल्या दिवशी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. पण बीबीसीने हवामान खात्याचा अंदाजाबाबत सांगितले आहे की, सामन्याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी चांगला खेळ होऊ शकेल. त्यामुळे चाहते आता दुसऱ्या दिवशी पावसाने हजेरी न लावता जास्तीत जास्त षटकांचा सामना खेळचला जावा, अशी आशा करत असतील. दुसऱ्या दिवशी कोणत्या गोष्टी पाहायला मिळू शकतात, जाणून घ्या...उद्याच्या दिवशी ९८ षटकांचा खेळ होऊ शकतो. पहिल्या दिवशी वाया गेलेली आठ षटके यावेळी टाकली जाऊ शकतात. त्याचबरोबर आता प्रत्येक दिवशी अतिरीक्त षटकांचा खेळ होऊ शकतो. कारण पहिल्या दिवशी वाया गेलेल्या षटकांची भरपाई आता .येत्या चार दिवसांमध्ये करण्यात येणार आहे. फायनलच्या दुसऱ्या दिवशीचा खेळ इंग्लंडच्या वेळेनुसार सकाळी १०.३० ला सुरु होणार आहे, म्हणजेच भारतामध्ये हा सामना दुपारी ३ वाजता सुरु होणार आहे. सामन्याच्या काही वेळापूर्वी नाणेफेक होईल. त्यावेळी दोन्ही कर्णधार आपल्या संघात कोणते खेळाडू आहेत, हे सांगतील आणि त्यानंतर सामन्याला सुरुवात करण्यात येईल. चाहत्यांना आता दुसऱ्या दिवसाच्या खेळाची उत्सुकता लागेलली आहे.

Pages