पनामा पेपर्सनंतर आर्थिक गैरव्यवहाराचा 'पँडोरा' गौप्यस्फोट; जगभरात खळबळ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 4, 2021

पनामा पेपर्सनंतर आर्थिक गैरव्यवहाराचा 'पँडोरा' गौप्यस्फोट; जगभरात खळबळ

https://ift.tt/3DeJmnv
टाइम्स वृत्त, वॉशिंग्टन: पाच वर्षांपूर्वी 'पनामा पेपर लीकने जगभरात खळबळ उडवली होती. बड्या व्यक्तींनी बनावट कंपन्यांच्या माध्यमातून केलेली करचुकवेगिरी यामुळे समोर आली होती. आता पुन्हा एकदा 'इंटरनॅशनल कन्सोर्टियम ऑफ इन्व्हेस्टिगेटिव जर्नालिस्ट्स'ने (आयसीआयजे) 'पँडोरा पेपरलीक'द्वारे आतापर्यंतचा सर्वात मोठा गौप्यस्फोट केला आहे. यामध्ये हा गैरव्यवहार कशाप्रकारे करण्यात आला होता आणि हा गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर भारतीय सेलिब्रिटींनी यावर कसा तोडगा काढायला सुरुवात केली याची यात माहिती देण्यात आली आहे. जगभरातून ११९ कोटी कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर हा 'आर्थिक गैरव्यवहार' जगासमोर उघड झाला आहे. ११७ देशांतील ६०० पत्रकार 'पेंडोरा पेपर लीक'च्या तपासात सहभागी होते, असे 'आयसीआयजे'ने सांगितले. एक इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार, ब्रिटनच्या न्यायालयात आपण दिवाळखोर असल्याचा दावा करणाऱ्या उद्योगपतीच्या परदेशात १८ कंपन्या आहेत. या यादीतील ३०० पेक्षा जास्त भारतीय नावांपैकी ६० जणांविरुद्ध पुरावे तपासण्यात आले असल्याचे या अहवालात म्हटले आहे. येत्या काही दिवसांत हे उघड होतील. या लोकांनी करचुकवेगिरीसाठी सामोआ, बेलीज, कुक बेटांपासून ते ब्रिटिश व्हर्जिन बेटे आणि पनामापर्यंत आश्रय घेतला आहे. दरम्यान, पँडोरा पेपरलीकमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या जवळच्या ७०० जणांच्या नावांचा समावेश आहे. यांची मालमत्ता परदेशात शेल कंपन्यांच्या स्वरूपात असल्याचा आरोप आहे.