टेन्शन वाढले! राजधानी हादरली... आढळला ओमिक्रॉनचा ५ वा रुग्ण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 5, 2021

टेन्शन वाढले! राजधानी हादरली... आढळला ओमिक्रॉनचा ५ वा रुग्ण

https://ift.tt/3Em6uRM
नवी दिल्लीः भारतात ''चा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आता रविवारी राजधानी दिल्लीत एका तरुणाला 'ओमिक्रॉन'चा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. दिल्लीत आढळून आलेल्या ओमिक्रॉनच्या पहिला रुग्णावर LNJP रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. तो काही दिवसांपूर्वी टांझानियातून भारतात आला आहे. दुसरीकडे, विदेशातून दिल्लीत आलेले एकूण १७ जण करोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आणि त्यांना LNJP रुग्णालयात दाखल केले गेली आहे, अशी माहिती दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली. दिल्लीत ओमिक्रॉनचा आढळलेला पहिला रुग्ण हा देशातील ओमिक्रॉनचा ५ वा रुग्ण आहे. देशात सर्वप्रथम कर्नाटकमध्ये ऑमिक्रॉनचे दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर गुजरातच्या जामनगरमध्ये एक आणि महाराष्ट्रातील डोंबिवलीत एका रुग्णाची नोंद झाली. आंतरराष्ट्रीय विमानांची भारतातील वाहतूक पूर्णपणे बंद करावी, अशी मागणी यापूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली होती. आता दिल्लीत ओमिक्रॉनचा रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी दिली आहे. ओमिक्रॉनचा रुग्णावर उपचार सुरू असलेल्या LNJP हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णाच्या प्रकृतीबाबत माहिती दिली आहे. रुग्णाचा घसा खवखवतोय, अशक्तपणा जाणवतोय आणि अंगदुखीही आहे, अशी माहिती एलएनजेपी हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुरेश कुमार यांनी दिली. दक्षिण आफ्रिकेत २५ नोव्हेंबरला ऑमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला होता. त्याचे नमुने ९ नोव्हेंबरला घेण्यात आले होते. २६ नोव्हेंबरला जागतिक आरोग्य संघटनेने करोनाच्या या नव्या वेरियंटला ओमिक्रॉन असे नाव दिले. तसेच ओमिक्रॉन हा 'वेरियंट ऑफ कन्सर्न' म्हणजे चिंता वाढवणारा असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले होते. आतापर्यंत जगातील एकूण २३ देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून आले आहेत. तसेच रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यताही जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली आहे. ओमिक्रॉनच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अनेक देशांनी प्रवासावर निर्बंध आणले आहेत. भारतातही विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आंतरराष्ट्रीय विमानतळांवर चाचणी केली जात आहे. तसेच प्रवासापूर्वीचा चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक केला आहे.