अभिनेत्री रिचा चड्ढाच्या 'या' वक्तव्यामुळे नवा वाद - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, September 27, 2019

अभिनेत्री रिचा चड्ढाच्या 'या' वक्तव्यामुळे नवा वाद

https://ift.tt/2n4GCHv
मुंबई: आपल्या दमदार अभिनयाबरोबरच अभिनेत्री तिच्या स्पष्टवक्तेपणासाठीही ओळखली जाते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रिचानं प्रसारमाध्यमं आणि सोशल मीडियावर ताशेरे ओढले. सोशल मीडियावर एखाद्या मुद्द्यावरून अभिनेत्रींवरच अधिकाधिक टीका होते. अभिनेत्यांबद्दल फार काही बोललं जात नाही, असं तिचं म्हणणं आहे. रिचा एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली की, 'सोशल मीडियावर एखाद्या मुद्द्यावरून अभिनेत्रींवरच अधिकाधिक टीका होते. अभिनेत्यांबद्दल फार काही बोललं जात नाही, माझ्या निरीक्षणानुसार प्रियांका चोप्रा, स्वरा भास्कर, सोनम कपूर यांसारख्या अभिनेत्रींवर सतत निशाणा साधला जातो. विविध मुद्द्यांवरून त्यांना ट्रोल केलं जातं.' रिचा चड्ढाच्या या वक्तव्यामुळे बीटाऊनमध्ये आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. त्यामुळे रिचाला पाठिंबा द्यायला कोणत्या अभिनेत्री पुढे येतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.