जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करा ही मागणी करत राज्यातीळ सरकारी कर्मचारी संपावर गेले आहेत, १४ मार्चच्या मध्यरात्रीपासून या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. जोपर्यंत सरकार मागणी मान्य करत नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही अशी भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. या जुन्या पेन्शन योजनेवरून राज्यातल्या विविध शहरांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा मोर्चा, आंदोलन किंवा इतर मार्गे होणारा संघर्ष पाहण्यास मिळतो आहे. अशात राज्य सरकारने यावर अद्याप काही तोडगा काढलेला नाही.
पालघर जिल्ह्याचा मोखाडा तालुका मध्ये जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रदर्शन जारी ठेवला आहे, श्री. भरत ये. गारे यांचे अध्यक्षतेखाली श्री. ईश्वर उ. पाटील, श्री. भाऊ का. नावळे, श्री. तुषार सूर्यवंशी आणि श्री. रघुनाथ गरेल सारखे सरकारी कर्मचारी संपावर ठाम आहे.