'तुझ्यात जीव रंगला'तून वहिनीसाहेबांची एक्झिट - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, October 29, 2019

'तुझ्यात जीव रंगला'तून वहिनीसाहेबांची एक्झिट

https://ift.tt/2MVEjRq
मुंबईः झी मराठीवरील '' या मालिकेने सुरू झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. रांगडा 'राणादा' आणि लाघवी पाठक बाई तर जणू प्रत्येकाच्या कुटुंबाचा भागच बनले. मालिकेत नेहमी राणा-अंजीलविरुद्ध कट-कारस्थाने करणाऱ्या नंदिता वहिनी म्हणजेच वहिनीसाहेब यांना सुद्धा प्रेक्षकांनी पसंती दिली. मात्र, वहिनीसाहेब यापुढे मालिकेत दिसणार नाहीयेत. नंदिता गायकवाड म्हणजेच मालिकेचा निरोप घेणार आहे. धनश्रीनं तिच्या फेसबुक पोस्टवर आज माझा शूटिंगचा शेवटचा दिवस असल्याचं म्हटलं आहे. 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत धनश्री काडगावकरनं वहिनीसाहेबांची भूमिका साकारली होती. मालिकेच्या सुरूवातीपासूनच धनश्रीची भूमिका लोकप्रिय झाली होती. नकारात्मक भूमिका असूनही नंदिता वहिनींना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मालिकेतील त्यांचे संवाद, त्यांची स्टाईल इतकंच नव्हे तर त्यांची कोल्हापूरी भाषाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. मालिकेतील वहिनीसाहेबांची भूमिका संपल्यानंतर प्रेक्षकांचा काहीसा हिरमोड झाला आहे. धनश्रीनं शूटिंगच्या शेवटच्या दिवशीचे तिचे काही फोटो आणि व्हिडिओ पोस्ट केले आहेत. हे व्हिडिओ पाहून तरी नंदिता मालिकेत आत्तापर्यंतच्या रचलेल्या कट-कारस्थानांची कबुली देताना दिसतेय. यावरूनच नंदितावरील आरोप सिद्ध होऊन शिक्षा होणार असल्याचं दिसतंय. धनश्रीनं जरी मालिकेतून एक्झिट घेतली असली तरी मालिकेत आणखी एक नवा चेहरा दिसणार आहे. राणादाची मुलगी लक्ष्मी गायकवाडची मालिकेत एन्ट्री झाली आहे. तसंच, मालिकेतील राणा दाचा लूक पुन्हा एकदा बदलला आहे. राणादा आता विद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पोलीस यंत्रणेत रुजू झालाय. पोलिसांची खाकी वर्दी चढवून तो आता नव्या रूपात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. मध्यंतरी मालिकेत अनेक चढ-उतार पाहायला मिळाले. नंदिता वहिनींनी राणाचा घडवून आणलेला अपघात. राणाची पुन्हा एन्ट्री. त्यानंतर राजा राजगोंडा बनून नंदिताला धडा शिकवणे यांमुळं मालिकेनं टीआरपीच्या शर्यतीतही नंबर मिळवला होता. लक्ष्मीच्या एन्ट्रीनं मालिका कोणतं नवं वळण घेतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.