१० रुपयांत जेवण, १ रुपयात आरोग्य चाचणी; सेनेचे वचन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 12, 2019

१० रुपयांत जेवण, १ रुपयात आरोग्य चाचणी; सेनेचे वचन

https://ift.tt/2p9fMPn
मुंबईः एकही वचन खोटं ठरणारं नाही, असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज पक्षाचा वचननामा जाहीर केला. राज्याच्या तिजोरीचा विचार करूनच वचननामा बनवला असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. १० रुपयांत चांगलं सकस जेवण. तेही स्वच्छ आणि व्यवस्थित असेल. विशेषत: एका किचनमधून त्याचं वितरण केलं जाईल. महिला बचत गटांतील महिलांना यामध्ये सामावून घेतलं जाईल, असं शिवसेने वचननाम्यात म्हटलंय. या शिवाय घरगुती वापरातील वीजेसाठी ३०० युनिटपर्यंत ३० टक्क्यांनी दर कमी करण्याचं आश्वासन शिवसेनेनं दिलंय. २०० प्राथमिक आरोग्य चाचण्या ज्या सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आहेत. त्या आरोग्यचाचण्या एका रुपयात देण्याची ग्वाही वचननाम्यातून देण्यात आली आहे. राज्याच्या तिजोरीचा विचार करून हा वचननामा आम्ही बनवलेला आहे. पूर्णपणे जबाबदारीने हा वचननामा आखलेला आहे. यातलं एकही वचन खोटं ठरणारं नाही." -शिवसेना पक्षप्रमुख मा. श्री. उद्धव साहेब ठाकरे