भाजपच मोठा भाऊ; मुख्यमंत्र्यांनी उत्तर टाळले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 2, 2019

भाजपच मोठा भाऊ; मुख्यमंत्र्यांनी उत्तर टाळले

https://ift.tt/2otele5
मुंबई: आज महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त वडाळा येथील संगम नगर येथे भारतीय जनता पक्षाने स्वच्छता मोहीम राबवली. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी यावेळी स्वत: झाडू हाती घेतला होता. राज्यातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या सेना-भाजपच्या जागावाटपानुसार भाजपच मोठा भाऊ ठरला, याबाबत यावेळी माध्यमांनी हटकले असता फडणवीस यांनी उत्तर टाळले. फडणवीस यांच्यासह किरीट सोमय्या, सरदार तारा सिंह, कालिदास कोलंबकर, तमिळ सिल्वन, मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी यावेळी येथील काही घरांमध्ये भाजप उमेदवार तमिल सिल्वन यांचे प्रचार पत्र देखील वाटले. 'आज सायन कोळीवाडा येथे स्वच्छता मोहीम राबवून आम्ही महात्मा गांधी यांना आदरांजली वाहिली आहे,' असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधीच्या विचारावर देश उभा केला आहे. आपण त्या महापुरुषाच्या तत्वावर चालले पाहिजे, असं वक्तव्य फडणवीस यांनी केले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत युतीची घोषणा करताना निम्या निम्म्या जागा वाटून घेण्याचे जाहीर करण्यात आले असले तरी प्रत्यक्षात शिवसेनेला निम्म्या जागा देण्यात आलेल्या नाहीत. येत्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना यांच्यात नुकतेच जागावाटप पार पडले. भाजपने शिवसेनेला शेवटपर्यंत जागांसाठी झुंजवत ठेवले आणि ऐनवेळी काही वाढीव जागा देत त्यांनी शिवसेनेला १२४ जागांवरच समाधान मानायला लावले. भाजप हाच मोठा भाऊ असल्याचे भाजपने दाखवून दिले. त्याबाबत फडणवीस यांना या स्वच्छता मोहिमेच्या वेळी पत्रकारांनी प्रश्न विचारले. मात्र त्यांनी उत्तर देणे टाळले. सुप्रीम कोर्टात फडणवीस यांच्याविरोधात दाखल झालेल्या याचिकेबाबतच्या प्रश्नावरही त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.