रहाणेने घरच्या मैदानावर ३ वर्षांनंतर ठोकले शतक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 20, 2019

रहाणेने घरच्या मैदानावर ३ वर्षांनंतर ठोकले शतक

https://ift.tt/33PpBkK
रांची: रांची स्टेडियमवर सुरू असलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात धडाकेबाज फलंदाज अजिंक्य रहाणेने शतक ठोकले. रहाणेने १६९ चेंडूमध्ये १४ चौकार आणि एक षटकार ठोकत आपल्या कारकिर्दीतील ११ वे शतक साजरे केले. या वेळी टाळ्यांच्या कडकडाटात क्रिकेटप्रेमींनी रहाणेचे अभिनंदन केले. तसे पाहिले तर या वर्षात अजिंक्य राहणेचे आजचे हे दुसरे शतक आहे. या पूर्वी त्याने ऑगस्ट महिन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध १०२ धावा केल्या होत्या. घरच्या मैदानावर तीन वर्षांनंतर ठोकले शतक तसे पाहिले तर, अजिंक्य रहाणेने घरच्या मैदानावर तब्बल तीन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमधील शतक ठोकले आहे. या पूर्वी त्याने ऑक्टोबर २०१६ मध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या सामन्यात इंदूरच्या होळकर मैदानावर शतक ठोकले होते. त्या वेळी रहाणेने १८८ धावा केल्या होत्या. हे शतक अजिंक्य रहाणेचे भारतीय मैदानावर केलेले चौथे शतक आहे, तर दक्षिण आफ्रिकेवरुद्ध त्याने केलेले हे तिसरे कसोटी शतक आहे. त्याने १०० वी धाव ६९ व्या षटकाची पहिल्याच चेंडूवर पूर्ण केली. केवळ १७ धावांच्या अंतरावर होता रहाणे तिसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवसाचा डाव प्रकाश मंदावल्याने नियोजित वेळेपूर्वीच संपल्यानंतर सलामीची फलंदाज रोहित (नाबाद ११७ धावा) आणि उपकर्णधार (नाबाद ८३ धावा) खेळपट्टीवर होते. याच दोन फलंदाजांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. रहाणे शतकापासून अवघा १७ धावा दूर होता. मात्र, या १७ धावा त्याने अगदी सहज केल्या. या दोन फलंदाजांदरम्यान २०० हून अधिक धावांची भागीदारी केली आहे. वाचा: पहिल्याच दिवशी गमावले ३ गडी भारतीय संघाने पहिल्याच सत्रात सलामीचा फलंदाज मयंक अग्रवाल (१०), चेतेश्वर पुजारा (०) आणि कर्णधार विराट कोहली (१२) धावांवर बाद झाले. टीम इंडियाच्या दृष्टने हे महत्त्वाचे फलंदाज होते. दक्षिण आफ्रिकेच्या जलदगती गोलंदाजांनी भारताला धक्के देत झुंजवायला भाग पाडले. कागिसो रबाडाने २ बळी मिळवले, तर एनरिचने एक बळी मिळवला. वाचा: मागच्या सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या मयंक अग्रवालने १९ चेंडूंमध्ये १० धावा केल्या. तर पुजारा खाते न खोलता तंबूत परतला. तिसरा बळी गेला विराट कोहलीचा. १२ धावा असताना एनरिचने टीम इंडियाचा हा खंदा गडी टिपला. या नंतर रोहितसोबत रहाणेने दमदार फलंदाजी करत भारतीय संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.