स्वत:चा आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईल: पवार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, October 26, 2019

स्वत:चा आब राखूनच शिवसेना सत्तेत सहभागी होईल: पवार

https://ift.tt/2pUI5kO
म. टा. वृत्तसेवा, बारामती ‘भाजप आणि शिवसेनेत सत्तास्थापनेसाठी ठरलेल्या फॉर्म्युल्याची अंमलबाजवणी झाली पाहिजे. याचा अर्थ ५०-५० टक्के किंवा त्यांचे जे काही ठरले असेल ते. मागच्या वेळी शिवसेनेच्या चार-दोन गोष्टी राहून गेल्या. मात्र, या वेळी ते काही सहन करतील, असे असे दिसत नाही. त्यामुळे स्वत:चा आब राखूनच सत्तेत सहभागी होईल,’ असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे यांनी व्यक्त केले. बारामतीतील गोविंदबाग या निवासस्थानी ते पत्रकारांशी बोलत होते. ‘सत्तेत सहभागी होण्यासाठी तरुण पिढीचा पाठिंबा नक्की आहे. मात्र, खुर्ची धरण्यासाठी टीम उभी करावी लागते. आमच्या डोक्यावरील जबाबदारीचे ओझे वाढले असून, भविष्यात तिची पूर्तता करणे कर्तव्य आहे आणि आम्ही ते अखंडपणाने करू,’ अशी ग्वाहीही त्यांनी दिली. ‘विधानसभा निवडणुकीत कोणती लढाईच नाही, असे तिचे स्वरूप करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांनी केला. लोकांनाही ही एकतर्फीच निवडणूक असे वाटले. मात्र, निवडणुकीला सामोरे जाताना पक्षाला प्रभावी भूमिका मांडता आली नाही, तर लोकांना दोष देता येणार नाही. ती आमची कमतरता आहे. ही कमतरता भरून काढण्यासाठी यंदा आव्हान आहे, हे लक्षात आल्याने मी त्या पद्धतीने सामोरा गेलो. राज्यातील तरुणाईने मला प्रचंड प्रतिसाद दिला, याचा प्रचंड आनंद आहे. सत्तेत सहभागी होण्यासाठी काहींनी पक्षांतर केले. मात्र, लोकांना हे पटले नाही. त्यांनी आमच्या बाजूने कौल दिला,’ असे पवार यांनी सांगितले.