उन्मादानं वागणाऱ्यांचा 'उदयनराजे' होतो: राऊत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, October 27, 2019

उन्मादानं वागणाऱ्यांचा 'उदयनराजे' होतो: राऊत

https://ift.tt/2NimwCS
मुंबई: विधानसभेचा निकाल लागल्यापासून सत्ताधारी भाजप हा विरोधकांबरोबरच मित्र पक्ष शिवसेनेच्याही रडारवर आला आहे. शिवसेनेचे नेते रोजच्या रोज भाजपवर प्रहार करत आहेत. नेते, खासदार यांनी निवडणूक निकालांचं विश्लेषण करताना पुन्हा एकदा भाजपवर जोरदार तोफ डागली आहे. 'उन्मादानं वागणाऱ्यांचा 'उदयनराजे' होतो, अशी खोचक टीका राऊत यांनी केली आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ''मध्ये राऊत यांनी एक लेख लिहिला आहे. राऊत यांनी या लेखातून भाजप व उदयनराजे यांच्यावर थेट निशाणा साधला आहे तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर स्तुतीसुमनं उधळली आहेत. शिवसेनेला अडवायचे व विरोधकांना कस्पटासमान लेखून पुढे जायचे ही भाजपची भूमिका होती. लोकांनी ती ठोकरून लावली. महाराष्ट्र लढणाऱ्यांच्या व संघर्ष करणाऱ्यांच्या पाठीशी उभा राहतो, हे यापूर्वी दिसले आहे. २०१४ व २०१९ मध्ये त्याची पुनरावृत्ती घडली. २०१४ साली भाजपचा वारू उद्धव ठाकरे यांनी रोखला होता, २०१९ ला तो शरद पवारांनी अडवला. १०६ जागा जिंकूनही भाजपच्या डोक्यावर टांगती तलवार आहे आणि फडणवीस यांच्या चेहऱ्यावर तणाव आहे,' असा चिमटा राऊत यांनी काढला आहे. शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले असं विचारणाऱ्यांना साताऱ्यासह राज्यातील १०० मतदारसंघात त्याचं उत्तर मिळालं, असंही त्यांनी म्हटलं आहे. उदयनराजेंना उडवायला 'कॉलर'च राहिली नाही! राऊत यांनी साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे यांच्यावरही टीकास्त्र सोडलं आहे. 'सातारच्या उदयनराजेंना यापुढं उडवायला 'कॉलर'ही शिल्लक ठेवली नाही, इतका दारुण पराभव त्यांच्या वाट्याला आला. जनता तुमची गुलाम नाही व तुम्ही स्वत: देवाचे अवतार नाही. शिवरायांनी स्वत:ला शेवटपर्यंत स्वराज्याचे सेवक म्हणवून घेतले. त्यांच्या तेराव्या वंशजाला शिवराय समजले नाहीत, हे लोकांनी दाखवून दिले,' असंही त्यांनी लेखात पुढं म्हटलं आहे.