Live: आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज अर्ज भरणार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, October 3, 2019

Live: आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज अर्ज भरणार

https://ift.tt/2o4TgqL
मुंबई: वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले शिवसेनेचे युवा नेते हे आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अर्ज भरण्यासाठी आदित्य पदयात्रेद्वारे जाणार आहेत. आदित्य यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईतील हजारो शिवसैनिकांनी वरळीत गर्दी केली आहे. आदित्य यांच्याबरोबरच महाराष्ट्रातील अनेक दिग्गज नेते आज आपापले उमेदवारी अर्ज भरणार आहेत. लाइव्ह अपडेट्स: >> >> मुंबई: आदित्य ठाकरे 'मातोश्री'हून निघाले, थोड्याच वेळात वरळीत पोहोचणार >> आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसे उमेदवार देणार नाही >> निवडणूक लढवणारे आदित्य हे ठाकरे घराण्यातील पहिलेच सदस्य >> आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोनवरून शुभेच्छा >> आदित्य यांच्या उमेदवारी अर्जाच्या निमित्तानं शिवसेना करणार जोरदार शक्तिप्रदर्शन >> आदित्य यांचा अर्ज भरताना ठाकरे कुटुंबीय उपस्थित राहणार >> आदित्य ठाकरेंच्या पदयात्रेत सर्वधर्मीयांचा सहभाग >> नवी मुंबई: ऐरोलीतून गणेश नाईक अर्ज भरणार >> सांगली: तासगावमधून राष्ट्रवादीच्या सुमनताई पाटील अर्ज भरणार >> अमित देशमुख (लातूर शहर), हसन मुश्रीफ (कोल्हापूर), विजय शिवतारे (पुणे) हेही अर्ज दाखल करणार >> महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप नेत्या पंकजा मुंडे आज परळी विधानसभेतून अर्ज भरणार >> उमेदवारी अर्ज भरताना आदित्य यांच्यासोबत भाजपचे कोणते नेते उपस्थित राहणार याबाबत उत्सुकता >> थोड्याच वेळात आदित्य ठाकरे पदयात्रेत सहभागी होणार >> पदयात्रा व मिरवणुकीसाठी शिवसैनिकांची जय्यत तयारी >> पदयात्रेद्वारे जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आदित्य अर्ज भरणार >> शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आज उमेदवारी अर्ज दाखल करणार