
मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक दिग्गज आज अर्ज दाखल करणार आहेत. मात्र, अजूनही उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांची घालमेल सुरू आहे. बंडाच्या भीतीनं नाव जाहीर न केलेल्या काही उमेदवारांना शेवटच्या क्षणी अर्ज भरण्याचा आदेश दिला जाऊ शकतो. त्यामुळं उत्सुकता ताणली गेली आहे. लाइव्ह अपडेट्स: >> भाजपच्या यादीतून विनोद तावडे, प्रकाश मेहता, राज पुरोहित यांचा पत्ता कट; चौथ्या यादीतही नाव नाही >> भाजपची चौथी यादी जाहीर; मुक्ताईनगरमधून एकनाथ खडसे यांची कन्या रोहिणी यांना तिकीट >> माजी मंत्री एकनाथ खडसे, विनोद तावडे आणि प्रकाश मेहता यांच्याबद्दल अद्याप निर्णय नाही >> बावनकुळे यांच्या उमेदवारीवर निर्णय होण्याची शक्यता >> भाजपचे जिल्हाध्यक्ष राजीव पोतदार हे देखील मुख्यमंत्र्यांच्या भेटीला >> भाजपच्या तिसऱ्या यादीतही नाव नसलेले उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट >> माजी उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीतून अर्ज दाखल करणार >> मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून अर्ज दाखल करणार; काँग्रेसचे आशिष देशमुख यांच्याशी होणार लढत >> उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस... उमेदवारांची धावपळ