नवी दिल्ली: महाराष्ट्रातील सत्तापेचावर सर्वोच्च न्यायालयानं आज दिलेल्या निर्णयाचं काँग्रेसनं स्वागत केलं आहे. 'न्यायालयाच्या या निर्णयामुळं देशाच्या राज्यघटनेचं महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे. 'देवेंद्र फडणवीस यांनी आता बहुमत चाचणीला सामोरं जाण्याआधीच राजीनामा द्यावा,' अशी मागणी काँग्रेस नेते यांनी केली.
एका रात्रीत राष्ट्रपती राजवट हटवून नव्या सरकारचा शपथविधी घडवून आणण्याच्या निर्णयाला शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. दोन दिवसांच्या युक्तिवादानंतर आज न्यायालयानं यावर निर्णय दिला. नव्या सरकारनं महाराष्ट्राच्या विधानसभेत उद्याच बहुमत सिद्ध करावं. बहुमत चाचणीच्या मतदानाचं थेट प्रक्षेपण व्हावं, असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. काँग्रेसनं या निर्णयावर समाधान व्यक्त केलं आहे. संविधान दिनी आलेला हा निर्णय देशाच्या राज्यघटनेचं महत्त्व अधोरेखित करणारा आहे. हा निर्णय म्हणजे राज्यघटनेचा सन्मान आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचं ट्विट शिवसेनेनंही या निकालावर आनंद व्यक्त केला आहे. शिवसेनेचे खासदार यांनी न्यायालयाच्या निकालानंतर 'सत्यमेव जयते' असं ट्विट केलं आहे. 'सत्याची बाजू त्रस्त होऊ शकते. पण पराभूत होऊ शकत नाही,' असं त्यांनी पुढच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. भाजपचा खेळ खल्लास: राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार यांनी निकालाचं स्वागत करताना 'सत्यमेव जयते' असं ट्विट केलं आहे. भाजपचा खेळ खल्लास... असंही त्यांनी म्हटलं आहे. विधानसभेतील सध्याचं पक्षीय बलाबल भाजप- १०५ शिवसेना - ५६ राष्ट्रवादी काँग्रेस- ५४ काँग्रेस- ४४ बहुजन विकास आघाडी- ३ एमआयएम- २ समाजवादी पार्टी- २ प्रहार जनशक्ती पार्टी- २ माकप- १ जनसुराज्य शक्ती- १ क्रांतिकारी शेतकरी पार्टी- १ महाराष्ट्र नवनिर्माण सेना- १ राष्ट्रीय समाज पक्ष- १ स्वाभिमानी पक्ष- १ शेकाप - १ अपक्ष- १३ एकूण जागा- २८८