अभिनेता विकी कौशलचं काय शिजतंय? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, November 6, 2019

अभिनेता विकी कौशलचं काय शिजतंय?

https://ift.tt/2PMLAoB
मुंबई: '' चित्रपटातील दमदार अभिनयामुळे अभिनेता विकी कौशलला या वर्षीचा मिळाला. त्यामुळे प्रेक्षकांच्या विकीकडून अपेक्षा वाढल्या आहेत. सध्या तो काही चित्रपटांच्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे. आपल्या बिझी वेळापत्रकातून वेळ काढत त्यानं एकता कपूरची भेट घेतल्याचं समजतंय. त्यामुळे एकताच्या पुढच्या चित्रपटात विकी असेल, अशा चर्चांना जोर आलाय. दिग्दर्शक अनीज बाजमी हे एकता कपूरच्या प्रॉडक्शन हाऊससोबत चित्रपटावर काम करणार आहेत. या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे हा कॉमेडी सिनेमा असून विकी कौशल एका हटके भूमिकेत यात दिसणार आहे. या चित्रपटाबद्दल आणि विकीच्या भूमिकेबद्दल माहिती देताना सूत्रांनी सांगितलं की, 'विकी कौशलला आजवर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये त्याच्या फॅन्सनी पाहिलं आहे, पण कॉमेडी फिल्ममध्ये मात्र विकी अद्याप दिसलेला नाही. विकीसुद्धा एका चांगल्या कॉमेडी चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या शोधात होता. दिग्दर्शक अनीज बाजमी काही दिवसांपूर्वी विकीला भेटले आणि त्यांनी या चित्रपटाबद्दल त्याला सांगितले. विकीला चित्रपटाची कथा आवडल्याने त्यानेही होकार दिला. आता या चित्रपटाच्या स्क्रिप्टचे काम पूर्ण झालं आहे. त्यामुळे लवकरच चित्रीकरणालाही सुरुवात होईल. ' असं सांगण्यात आलं आहे. दिग्दर्शक अनीज बाजमी मात्र सध्या आगामी पागलपंती चित्रपटाच्या कामात व्यग्र आहेत. त्यामुळे विकीसोबत या नव्या चित्रपटाविषयी बोलताना ते म्हणाले की, 'सध्या मी 'पागलपंती' चित्रपटाच्या प्रॉडक्शनच्या कामात प्रचंड व्यग्र आहे. 'पागलपंती'चे काम पूर्ण झाल्यानंतरच मी इतर चित्रपटांचा विचार करणार आहे. पुढच्या आठवड्यात मला माझ्या कामांमधून वेळ मिळेल त्यानंतर मी या चित्रपटाच्या वेळापत्रकाचा विचार करेन. या नव्या चित्रपटाबद्दल आम्ही त्याचवेळी सविस्तर चर्चा करू' असं बाजमी म्हणाले. त्यामुळे आता हे दोघं प्रेक्षकांसाठी काय घेऊन येतील हे पाहण्यासारखं असेल.