रोहित राऊतच्या गाण्यावर रडला कार्तिक आर्यन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, November 29, 2019

रोहित राऊतच्या गाण्यावर रडला कार्तिक आर्यन

https://ift.tt/2L1Aau0
मुंबईः कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे स्टारर 'पती, पत्नी और वो' सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी हे त्रिकूट इंडियन आयडॉल ११ या रिअॅलिटी शोमध्ये गेले होते. नुकताच सोनी टीव्हीने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या भागाचा एक प्रोमो शेअर केला आहे. येता रविवार हा 'माँ स्पेशल' असणार आहे. त्यामुळे प्रत्येक स्पर्धकांनी खास आईसाठी गाणी गायली. यावेळी रोहित राऊतने 'रंग दे बसंती'मधलं 'लुका छुपी' हे गाणं गायलं. त्याच्या याच गाण्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहितचं हे गाणं ऐकताना कार्तिक आणि भूमी फार भावुक झाले होते. या प्रोमोमध्ये रोहित म्हणाला की, 'मला आई नाही. पण माझे बाबाच माझी आई आणि मित्र आहे.' याशिवाय अलीगढमधून आलेल्या शाहजां मुजेबचं गाणं ऐकूनही कार्तिक भावुक झाला होता. याशिवाय कमल हसन आणि श्रीदेवी यांच्या 'सदमा' सिनेमातील 'सुरमईं अंखियों मैं' गाणं ऐकूनही कार्तिकला गहिवरून आलं होतं. माँ स्पेशल या भागातला आपला अनुभव खास होता असं कार्तिक म्हणाला. हे माझं सर्वात आवडीचं गाणं असल्याचंही तो म्हणाला. यावेळी शोच्या टीमने कार्तिकचा एक खास व्हिडिओ सर्वांना दाखवला. यात कार्तिकची आई स्टार होण्यासाठी त्याचा ग्वालिअर ते मुंबई प्रवासापर्यंत बोलताना दिसते. तेव्हा कार्तिकने सांगितलं की त्याच्या आईला स्तनांचा कर्करोग झाला होता. मोठ्या हिंमतीने तिने यावर मात केली आणि मुलाला पाठिंबा देण्यासाठी ती अनेकदा मुंबईला यायची. इंडियल आयडॉल ११ ची परीक्षक नेहा कक्कडनेही आतापर्यंतच्या स्पेशल एपिसोडपैकी हा एक असल्याचं म्हटलं.