धुळे: भीषण अपघातात ७ ऊसतोड कामगार ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 30, 2019

धुळे: भीषण अपघातात ७ ऊसतोड कामगार ठार

https://ift.tt/2Y0tq4z
धुळे: मध्य प्रदेशातील घेऊन येणाऱ्या पिकअप व्हॅनला झालेल्या भीषण अपघातात ७ मजूर ठार झाले आहेत. या अपघातात जखमी झालेल्यांपैकी ८ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये २ महिला ५ मुलांचा सहभाग आहे. या अपघातात १९ जण जखमी असून या पिकअप व्हॅनमध्ये एकूण ३१ कामगार होते. धुळे-सोलापूर महामार्गावर बोरी नदीच्या पुलावर मध्यरात्रीनंतर हा भीषण अपघात झाला. वाहनाच्या चालकाला पुल अरुंद असल्याचा अंदाज न आल्याने त्याचा ताबा सुटून हा अपघात झाला. पुलावरून हे वाहन थेट नदीपात्रात कोसळला. स्थानिकांनी धाव घेत अपघातग्रस्तांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. हे वाहन नदीतील पाण्यात कोसळल्याने बचावकार्य कठीण झाले होते. मात्र, मोठ्या धैर्याने स्थानिकांनी २० ते २५ जणांना पाण्यातून बाहेर काढले. मात्र, यांपैकी ७ जण मृत पावले होते. स्थानिकांनी अपघातग्रस्तांना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल केले. अपघातग्रस्तांमध्ये लहान मुलांचाही समावेश आहे. धुळे-सोलापूर महामार्ग हा अपघातप्रवण म्हणून प्रसिद्ध आहे. शिवाय या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यानेही इथे वारंवार अपघात होत असतात.