
पुणे: ही काही ना काही करणांमुळे चर्चेत असते. कधी ती एखादं बेधडक वक्तव्य करते, तर कधी एखादा व्हिडिओ निमित्त ठरतो. नुकताच तिनं सोशल मीडियावर एक व्हिडिओ टाकला आहे. ती बिग बॉस १३मध्ये असलेल्या काही जणांविषयी त्यामध्ये बोलली आहे. बोलली नव्हे, ती रागावलीच आहे. तिचा सर्वांत जास्त राग शेफाली जरीवालावर आहे. का? कारण एका टास्कच्या दरम्यान ती शहनाज गिलला उद्देशून म्हणाली, 'तू पंजाबची राखी सावंत आहेस.' बिग बॉसच्या घरात टास्क दरम्यान आणि इतरही वेळा बरीच भांडणं होत असतात. अशा भांडणात आपल्याला ओढावं हे राखीला अजिबात पसंत पडलेलं नाही. ट्रान्सपोर्ट टास्कच्या दरम्यान शहनाज घरातल्यांना त्रास देत होती. त्यामुळे शेफाली त्रासली होती. त्यावेळी ती शहनाजला पंजाबची राखी सावंत म्हणाली. या विषयीचा राग राखीनं तिच्या व्हिडिओमध्ये व्यक्त केला आहे. तिच्याबरोबर तिनं इतर स्पर्धक, सलमान खान आणि बिग बॉस यांनाही सोडलेलं नाही. तिच्यावर कमेंट करणाऱ्या शेफालीवर कारवाई करावी, असं तिनं सलमानला सुचवलं आहे. मी शेफालीवर केस करेन, असंही ती म्हणते. गंमत म्हणजे ती सलमानला अंकल म्हणून संबोधित करते. राखी सावंत बनणं काही सोपं काम नाही असं म्हणताना राखीनं स्वत:ची तुलाना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींशी केली आहे. 'राखी सावंत इस दुनियामे सिर्फ एक ही है' असं म्हणत तिनं स्वत:बद्दल बोलायला सरुवात केली. 'राखी सावंत बनायला फार मेहनत घ्यावी लागते. मी खूप मेहनतीने या पदावर पोहोचले आहे. ज्याप्रमाणे मोदीजींनी मेहनत घेऊन आज त्यांचे पद गाठले आहे तशीच मेहनत मी घेतलीय आहे आणि त्यामुळेच राखी सावंत आज या पदावर आहे ' असं ती म्हणाली आहे.