
मुंबईः अभिनेता आणि याचं नातं आता काही लपून राहिलं नाहीये. बॉलिवूडमधील पार्टी असो किंवा एखादा कार्यक्रम असो सगळीकडे दोघं जोडीने हजेरी लावतात. लवकरच हे लव्हबर्ड्स लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याची चर्चा आहे. शिबानी आणि फरहान फेब्रुवारी किंवा मार्चपर्यंत लग्न करण्याचा विचार करत आहेत. शिबानीचं फरहानच्या मुलांसोबतही अगदी घट्ट नातं निर्माण झालं आहे. काही दिवसांपूर्वीच फरहानच्या मुलांनी त्यांच्या नात्याला हिरवा कंदील दिला आहे. फरहानच्या एका इन्स्टाग्राम पोस्टमुळं मध्यंतरी शिबानी आणि फरहाननं गुपचूप साखरपुडा उरकल्याचीही चर्चा होती. दरम्यान, फरहानने २०१७साली पत्नी अधुनासोबत घटस्फोट घेतला होता. फरहान आणि अधुनाला दोन मुलं आहेत. घटस्फोटानंतर फरहानचं नाव अभिनेत्री श्रद्धा कपूरसोबत जोडलं गेलं होतं. मात्र, शक्ती कपूर यांना त्याचं हे नातं मान्य नसल्याने त्यांनी हे नातं तिथंच थांबवण्याचा निर्णय घेतला. श्रद्धासोबत ब्रेकअप झाल्यानंतर फरहाननं शिबानीला डेट करायला सुरुवात केली. शिबानी आणि फरहाननं जरी जाहीरपणे नात्याची कबुली दिली नसली तरी त्यांचे इन्स्टाग्रामवरील फोटोंमुळं ते नेहमी चर्चेत असतात.