मुंबई: बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७ वा स्मृतिदिन... राज्यभरातील शिवसैनिक आज शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळाला भेट देत त्यांना आदरांजली वाहत आहेत. अनेक राजकीय नेतेही बाळासाहेबांना शिवाजी पार्क येथे आदरांजली वाहण्यासाठी येतील. राज्यात होऊ पाहत असलेल्या सत्ता समीकरणाऱ्या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि भारतीय जनतापक्षाव्यतिरिक्त शिवसेनेचे नवे मित्र असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेतेही बाळासाहेबांच्या सृतिस्थळाला भेट देत आदरांजली वाहण्याची शक्यता आहे. पाहुयात... क्षणोक्षणीचे अपडेट्स... लाइव्ह अपडेट्स.... >> आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या सर्वांना स्वाभिमान जपण्याचा आदर्श दिला; बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिंना अभिवादन करताना देवेंद्र फडणवीस यांनी केले ट्विट >> भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिंना अभिवादन >> मुंबईतील शिवाजी पार्क येथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी येत शिवसैनिकांनी आदरांजली वाहण्यास सुरूवात >> शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ७ वा स्मृतिदिन