मुंबई: राज्यात गेल्या काही दिवसांच्या नाट्यमय घटनेनंतर अखेर मुख्यमंत्रिपदासाठी आवश्यक असलेला बहुमताचा आकडा असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांनी आगामी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांची एकमताने निवड केली. येत्या १ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता शिवतीर्थावर उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याचेही यावेळी जाहीर करण्यात आले. दरम्यान, आज सकाळी आठ वाजता विधानभवनात सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार असून विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आज सर्व आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार आहेत. जाणून घ्या या घडामोडींचे LIVE अपडेट्स... LIVE अपडेट्स: >> विधीमंडळात आमदारांच्या शपथविधीला सुरुवात>> पवार साहेब माझे नेते आहेत आणि त्यांचे ऐकणं माझी जबाबदारी: अजित पवार>> मी राष्ट्रवादीतच होतो आणि कायम राष्ट्रवादीतच राहीन: अजित पवार>> सध्या काहीही बोलायचं नाही; मी योग्यवेळी बोलेन: अजित पवार >> विधानसभेचे हंगामी अध्यक्ष कालिदास कोळंबकर आज सर्व आमदारांना पद आणि गोपनियतेची शपथ देणार >> सकाळी आठ वाजता विधानभवनात सर्व नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार