अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिर उभारा: SC - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, November 9, 2019

अयोध्येतील वादग्रस्त जागी राम मंदिर उभारा: SC

https://ift.tt/2NtGcVN
नवी दिल्ली: गेल्या अनेक दशकांपासून सुरू असलेला रामजन्मभूमी-बाबरी मशीद प्रकरणाचा वाद आता संपुष्टात आला असून वादग्रस्त जागा ही हिंदूंची असल्याचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाच्या पीठाने दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या या निकालामुळे आता वादग्रस्त जमिनीवर राम मंदिर उभारण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे समजले जात आहे. दरम्यान, मु्स्लिमांना अयोध्येत ५ एकर पर्यायी जागा देण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. ट्रस्ट स्थापन करून मंदिर उभारणीची योजना आखा सुप्रीम कोर्टाने वादग्रस्त जागी राम मंदिर उभारणीसाठी एका ट्रस्टची स्थापना करण्यात यावी असे आदेश निकाल वाचनादरम्यान दिली. या जागेत येत्या तीन महिन्यात मंदिर उभारण्याचे काम सुरू करावे असे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सुन्नी वक्फ बोर्डाकडून निर्णयाचे स्वागत सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचा सुन्नी वक्फ बोर्डाने स्वागत केले आहे.