समुद्री चाच्यांनी केले १८ भारतीयांचे अपहरण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 5, 2019

समुद्री चाच्यांनी केले १८ भारतीयांचे अपहरण

https://ift.tt/2LlnL3V
नवी दिल्ली: नायजेरियाच्या किनारपट्टीजवळ, हाँगकाँगला जाणाऱ्या जहाजात समुद्री चाच्यांनी केल्याची घटना घडली आहे. सागरी घटनांवर नजर ठेवणाऱ्या एका जागतिक संस्थेने ही माहिती दिली आहे. हे जहाज सुरक्षित असून ते नायजेरिया नौदलाच्या देखरेखीखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेबाबत अधिकृत सूत्रांनी सांगितले की, भारतीयांचे अपहरण झाल्याच्या वृत्तानंतर नायजेरियातील भारतीय मिशनने या घटनेशी संबंधित माहिती शोधण्यासाठी आणि अपहरण केलेल्या भारतीयांना वाचवण्यासाठी आफ्रिकेतील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. जहाजाच्या हालचालींचा मागोवा घेणार्‍या एआरएक्स मेरीटाईमने आपल्या संकेतस्थळावर मंगळवारी समुद्री चाच्यांनी हे जहाज पकडल्याचे वृत्त दिले आहे. चाच्यांनी जहाजातील १९ लोकांचे अपहरण केले. त्यातील १८ भारतीय आणि एक तुर्की नागरिक आहे. ३ डिसेंबर रोजी संध्याकाळी नायजेरियन किनारपट्टीवरून जात असताना हाँगकाँगचा ध्वज असलेल्या 'व्हीएलसीसी, एनएव्हीई नक्षत्र' या जहाजावर समुद्री चाच्यांनी हल्ला केला.