
वि शाखापट्टणम: भारत आणि वेस्ट इंडिज () यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज विशाखापट्टणम येथे होणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने गमवला आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान राखण्यासाठी भारताला या सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. भारताने घरच्या मैदानावर गेल्या १५ वर्षात एकही द्विपक्षीय मालिका गमावलेली नाही. अशा परिस्थितीत कर्णधार विराट कोहली नेतृत्वाखालील भारतीय संघ या सामन्यात कोणत्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरेल. दुपारी १.३० वाजता सुरु होणाऱ्या या सामन्यातआधी विशाखापट्टणम मैदानाशी संबंधित काही विक्रम आणि रंजक माहिती जाणून घेऊयात... > विशाखापट्टणम मैदानावर भारताचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ची सरासरी १३९ इतकी आहे. विराटने या मैदानावर पाच सामन्यात तीन शतकांच्या मदतीने ५४९ धावा केल्या आहेत. जर भारतीय संघाला या सामन्यात विजय मिळवायचा असेल तर विराटला अशीच एक मोठी खेळी करावी लागले. वाचा- > या मैदानावर खेळल्या गेलेल्या अखेरच्या सहा वनडे सामन्यात फक्त एक वेळा पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाला विजय मिळवता आला आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात दोन्ही संघ प्रथम गोलंदाजी करण्यास प्राधान्य देतील. > २०१०नंतर या मैदानावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाची सरासरी धावसंख्या २७५ इतकी आहे. कोणत्याही संघाला या मैदानावर विजय मिळवायचा असेल तर त्याला मोठी धावसंख्या उभी करावी लागले. कारण या मैदानावर पहिल्यापेक्षा दुसऱ्यांदा फलंदाजीकरणे सोप्प मानल जाते. वाचा- > भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात या मैदानावर झालेल्या अखेरच्या सामन्यात शाई होपने १२३ धावांची खेळी केली होती. तेव्हा सामना टाय झाला होता. सध्या सुरु असलेल्या मालिकेतील पहिल्याच सामन्यात होपने शतकी खेळी केली होती. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना त्याला लवकरात लवकर बाद करावे लागेल.