हसीनाबेन यांची घरवापसी; मिळाले नागरिकत्व - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 20, 2019

हसीनाबेन यांची घरवापसी; मिळाले नागरिकत्व

https://ift.tt/35GaYBv
द्वारका: राष्ट्रपतींच्या परवानगीनंतर नवीन नागरिकत्व दुरुस्ती कायदा अस्तित्त्वात आला असला तरी या कायद्याविरोधात देशभर निदर्शने सुरू आहेत. दरम्यान, देशभरात प्रक्षोभाचे वातावरण उसळलेले असताना दुसरीकडे पाकिस्तानमधून भारतात आलेल्या यांना भारताचे नागरिकत्व देण्यात आले आहे. हसीना बेन यांनी दोन वर्षांपूर्वी भारताचे नागरिकत्व मिळण्यासाठी अर्ज केला होता. मात्र, त्यांचा अर्ज प्रलंबित होता. आता भारत सरकारने त्याचा अर्ज मान्य केला आहे. हसीना बेन यांचा जन्म गुजरातच्या भानवड तालुक्यात झाला. त्या येथे लहानाच्या मोठ्या झाल्या. पुढे त्यांनी सन १९९९ मध्ये मध्ये एका पाकिस्तानी नागरिकाशी लग्न करून त्या पाकिस्तानात गेल्या आणि पाकिस्तानच्या नागरिक बनल्या. लग्नानंतर हसीना पाकिस्तानातच राहिल्या,असे गुजरातमधील द्वारका जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. नरेंद्र कुमार मीणा हसीना बेन यांना नागरिकत्व दिल्यानंतर माहिती देताना सांगितले. हसीना बेन यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. पतीच्या निधनानंतर त्या भारतात परतल्या आणि त्यानंतर त्यांनी भारताच्या नागरिकत्वासाठी अर्ज केला. ही बाब विचारात घेऊन भारत सरकार आणि गुजरात सरकारने हसीना यांना नागरिकत्व दिले आहे. त्यांना १८ डिसेंबर रोजी नागरिकत्व प्रमाणपत्र देण्यात आले, अशी माहिती मीणा यांनी दिली.