ब्लॅक मंडे... सेन्सेक्स ४५० अंकांनी गडगडला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, January 6, 2020

ब्लॅक मंडे... सेन्सेक्स ४५० अंकांनी गडगडला

https://ift.tt/2QRMKhc
मुंबई : आणि देशांतर्गत अस्थिरतेने धास्तावलेल्या गुंतवणूकदारांनी सोमवारी शेअर बाजार उघडताच जोरदार विक्री केली. यामुळे सकाळच्या सत्रात सेन्सेक्स ४५० अंकांनी गडगडला. सध्या तो ४१ हजारांवर व्यवहार करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत तब्बल १४० अंकांची पडझड झाली असून तो १२ हजार ८७ अंकांवर आहे. आजच्या सत्रात स्थावर मालमत्ता, बँका, एनबीएफसी, आयटी, टेक या क्षेत्रांत गुंतवणूकदारांनी विक्रीचा मारा सुरु ठेवला आहे.आजच्या सत्रात टेक महिंद्रा, आयटीसी, एचसीएल टेक, बजाज फायनान्स, रिलायन्स, एचडीएफसी बँक, मारुती, एसबीआय, एशियन पेंट पॉवरग्रीड, एचडीएफसी हे शेअर घसरले. आशियातील सिंगापूर आणि जपानमधील बाजारात नकारात्मक सुरुवात झाली. अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावाने मध्यपूर्वेत युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे खनिज तेल आणि सोने या दोन प्रमुख वस्तूंच्या किमतीत वाढ झाली आहे. जागतिक बाजारात सोने दर १.२ टक्क्यांनी वाढून १५६९ डॉलर प्रति औस गेला आहे. खनिज तेलाचा भाव प्रति बॅरल ६९.६२ डॉलर आहे. दरम्यान जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील संकुलात आज सायंकाळी विद्यार्थ्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. जेएनयूएसयू आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांमध्ये राडा झाला. मात्र दोन्ही संघटनांनी एकमेकांवर दोषारोप केले आहेत. या हल्ल्यात जेएनयूएसयूची अध्यक्ष आयशी घोष आणि अन्य अनेक विद्यार्थ्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे.