
नवी दिल्लीः दिल्लीतील जवाहलाल नेहरू विद्यापीठात शुल्क वाढीविरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला काल रात्री हिंसक वळण लागलं. यामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांना मारहाण करण्यात आली असून, एका शिक्षिकेसह २० विद्यार्थी जखमी झाले. या प्रकारानंतर विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. लाइव्ह अपडेट्स: >>औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात प्रकरणी आंदोलन >>महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा राजकारणासाठी वापर करणं चुकीचं: स्मृती इराणी >> जेएनयूतील हल्लेखोरांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे: पार्थ पवार >>मालमत्तेचं नुकसान, हिंसाचार केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल >>हिंसाचारादरम्यान जखमी झाल्याने हॉस्पिटलमध्ये दाखल केलेल्या विद्यार्थ्यांना डिस्चार्ज >> जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचे मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात तीव्र पडसाद उमटले