दिल्ली हिंसा: कपिल मिश्रांच्या अटकेची मागणी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, February 25, 2020

दिल्ली हिंसा: कपिल मिश्रांच्या अटकेची मागणी

https://ift.tt/3c1KHRE
नवी दिल्लीः दिल्लीच्या इशान्य भागात हिंसा भडकवल्याप्रकरणी भाजप नेते यांना अटक करण्याची मागणी जामिया समन्वय समितीनं सोमवारी केली आहे. समितीनं पोलिस मुख्यालयाबाहेर दिल्लीतील हिंसाचाराविरोधात आंदोलनाची हाक दिली होती. मात्र, पोलीस आयुक्तांसोबत झालेल्या चर्चेनंतर आंदोलनाचा पवित्रा मागे घेत पोलिसांसमोर काही मागण्या ठेवल्या. कपिल मिश्रा यांनी त्यांच्या भाषणातून व ट्वीटच्या माध्यमातून दिल्लीतील इशान्य भागात हिंसा भडकवण्याचा प्रयत्न केला असून त्यांच्यावर एफआयआर दाखल करुन तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. तसंच, दिल्लीतील ज्या २० ठिकाणी सीएएविरोधात सुरु असणाऱ्या आंदोलन स्थळांवरील सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. यामध्ये शाहीन बाग, जामिया मिलिया इस्लामिया, मुस्तफाबाद, तुर्कमान गेट, खुरेजी, जामा मस्जिद, जाफराबाद मेट्रो स्टेशन यांचा समावेश आहे. ईशान्य दिल्लीतील जाफराबादमध्ये सुरू असलेल्या हिंसाचार नियंत्रणात आणण्यासाठी उच्चस्तरीय पातळीवर विचार सुरू आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून तातडीची बैठक घेतली. तर परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचं केंद्रीय गृहसचिव ए. के. बल्ला यांनी सांगितलं.