
आचार्य कृष्ण दत्त शर्मा बॉलिवूडमधील निर्माता यांचा आज जन्मदिन आहे. साजिद नाडियाडवाला यांच्यासह आज जन्मदिवस असणाऱ्यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा... आज वाढदिवस असणाऱ्यांना आगामी वर्ष कसे जाईल, पाहूया... आगामी वर्षांत आपल्यावर चंद्र आणि मंगळ ग्रहाचा प्रभाव राहील. उर्वरित फेब्रुवारी व मार्च महिन्यात प्रेरणा देणाऱ्या घटना घडतील. एप्रिल महिन्यात प्रचंड यश मिळण्याचे संकेत आहेत. मे-जून या कालावधीत शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिकांना धनलाभ होईल. विद्यार्थ्यांना बुद्धीच्या जोरावर प्रसिद्धी मिळेल. जुलै महिन्यात साहित्य निर्मिती केली जाईल. आरोग्याच्या तक्रारी दूर होतील. सप्टेंबर व ऑक्टोबर या महिन्यात सर्जनशील व सृजनात्मक कामे कराल. नोव्हेंबर महिना आर्थिक दृष्ट्या अनुकूल राहील. डिसेंबर महिन्यात महिलांना अडचणींचा सामना करावा लागेल. जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये नशीब साथ देईल. विद्यार्थ्यांना परीश्रम केल्याशिवाय अपेक्षित यश मिळणार नाही. आगामी वर्षात सूर्याची उपासना करणे फायदेशीर ठरेल.