जन्मदिवस भविष्यः संमिश्र फळ देणारे वर्ष - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, February 25, 2020

जन्मदिवस भविष्यः संमिश्र फळ देणारे वर्ष

https://ift.tt/2HSfnqH
आचार्य कृष्ण दत्त शर्माबॉलिवूड अभिनेता याचा आज जन्मदिवस असून, शाहिद कपूर याच्यासह आज वाढदिवस असणाऱ्यांना उत्तम भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. आज वाढदिवस असणाऱ्यांना यंदाचे वर्ष कसे जाईल, याचा घेतलेला आढावा... आगामी वर्षात आपल्यावर चंद्र, बुध, मंगळ, शनि या ग्रहांचा प्रभाव राहील. फेब्रुवारी अखेरीस व्यापारात काहीसा निरुत्साह जाणवेल. मार्च आणि एप्रिल महिन्यात हाती घेतलेली कामे रखडण्याची चिन्हे आहेत. मे व जून महिन्यात रखडलेली कामे हळूहळू मार्गी लागतील. व्यापारातील निरुत्साहीपणा कमी होईल. जुलै महिन्यात अडकलेला पैसा, प्रलंबित येणी प्राप्त होतील. ऑगस्ट महिना लाभदायक होऊन नफा होईल. प्रतिकूल असलेली आर्थिक स्थिती सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात अनुकूल होईल. नोव्हेंबर-डिसेंबर महिना धार्मिक कार्यात जाईल. यामुळे कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. या वर्षअखेरीस विशेष करून महिलांना शुभफलदायक ग्रहमान असेल. जानेवारी व फेब्रुवारी २०२१ मध्ये विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही. तरी मेहनत करणे सोडू नये. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमध्ये वाढ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.