चेन्नई: ज्येष्ठ अभिनेते यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान झालेल्या एका अपघातात ३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १० जण जखणी झाले आहेत. '' या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना क्रेन कोसळल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये दिग्दर्शक शंकर यांचे पर्सनल दिग्दर्शक मधु, सहाय्यक दिग्दर्शक कृष्णा आणि एक कर्मचारी चंद्रन यांचा समावेश आहे. या चित्रपटाचे शूटिंग चेन्नई शहराजवळ सुरू होते. या अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.