तामिळनाडूत बस-ट्रकचा भीषण अपघात; १९ ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, February 20, 2020

तामिळनाडूत बस-ट्रकचा भीषण अपघात; १९ ठार

https://ift.tt/39MRCvX
चेन्नई: तामिळनाडूत झालेल्या बस आणि ट्रकच्या भीषण अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये १४ पुरुष आणि ५ महिलांचा समावेश आहे. या अपघातात अनेक जण जखणी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या भीषण अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात तिरुपूर जिल्ह्यातील अविनाशी या शहराजवळ झाला. अपघातग्रस्त बस बेंगळुरूहून केरळ राज्यात जात होती. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले. या अपघातातील जखमींना तातडीने तिरुपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.