Live ट्रम्प दौरा: मोदी अहमदाबादमध्ये दाखल - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 24, 2020

Live ट्रम्प दौरा: मोदी अहमदाबादमध्ये दाखल

https://ift.tt/2unyohu
नवी दिल्ली : आज आपल्या पहिल्या भारत दौऱ्यावर दाखल होत आहेत. दुपारी १२.०० वाजल्याच्या सुमारास ते अहमदाबादमध्ये पोहचतील. भारतात येण्यासाठी ट्रम्प अमेरिकेहून निघालेत. अँड्र्यू एअर फोर्स तळावरून त्यांच्या विमानाने उड्डाण घेतलंय. ट्रम्प यांच्याबरोबर त्यांची पत्नी मेलेनिया, मुलगी इव्हांका, जावई जेअर्ड कुश्नेर यांच्यासह त्यांच्या सरकारीमधील उच्चपदस्थांचा शिष्टमंडळात समावेश आहे. या संपूर्ण दौऱ्याच्या लाईव्ह अपडेटस Times कडून तुम्हाला मिळणार आहेत... एकाच ठिकाणी... सोशल मीडियावर वापरायला विसरू नका.

LIVE अपडेटस्>> राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान मोदी अहमदाबादमध्ये दाखल झालेत. >> दरम्यान मोटेरा स्टेडियमजवळ आज सकाळपासून गर्दी दिसून येतेय. ट्रम्प यांना पाहण्यासाठी लोकांमध्ये उत्साह दिसून येतोय. ट्रम्प भारतात येण्याअगोदरच लोकांनी स्टेडियममध्ये आपल्या जागा पकडून ठेवल्या आहेत. >> : जम्मू काश्मीरच्या कलाकारांचा एक ग्रुप अहमदाबादच्या साबरमती आश्रमाजवळ आपली कला सादर करत आहे. हा ग्रुपही राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांच्या रोड शो दरम्यान परफॉर्म करणार आहे. >> राजधानी दिल्लीत ठिकठिकाणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प, मेलेनिया आणि यांचे होर्डिंग्स लागलेले दिसत आहेत. आपला अहमदाबाद आणि आग्रा दौरा आटोपल्यानंतर ट्रम्प दिल्लीला जाणार आहेत. 'भारत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आगमनाची प्रतिक्षा करत आहे. तुमचा हा दौरा निश्चितच उभयदेशांत मित्रता दृढ करणारा ठरेल. लवकरच अहमदाबादमध्ये भेटुया' असं ट्विट भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. >> मोदी सरकार आणि गुजरात - उत्तर प्रदेश सरकार ट्रम्प यांच्या या दौऱ्यासाठी खास उत्सुक असलं तरी सोशल मीडियावर मात्र #GoBackTrump ट्रेन्ड होताना दिसतंय. >> जगातील सर्वात मोठं स्टेडियम म्हणून ओळख मिळवणारं गुजरातचं मोटेरा स्टेडियम आता डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी सज्ज झालंय. अतिशय भव्य स्टेडियम आता देखणंही दिसू लागलंय. ट्रम्प आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे सोमवारी दुपारी अहमदाबादमध्ये आगमन होत आहे. तेथे नव्याने बांधण्यात आलेल्या मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये ' ' हा कार्यक्रम होणार आहे. विमानतळ ते स्टेडियमदरम्यान, ट्रम्प आणि मोदी यांचा रोड शो होणार असून, या मार्गावर २४ व्यासपीठावरून भारताच्या विविधतेचे दर्शन घडविण्यात येणार आहे.