करोना रुग्णांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ; २४ तासांत ७,४६६ रुग्ण - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 29, 2020

करोना रुग्णांच्या संख्येत सर्वात मोठी वाढ; २४ तासांत ७,४६६ रुग्ण

https://ift.tt/2Al4qx8
नवी दिल्ली: देशभरात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून गेल्या २४ तासांमध्ये करोनाचे एकूण ७,४६६ नवे रुग्ण आढळले आहेत. ही एका दिवसात झालेली आतार्यंतची सर्वाधिक वाढ आहे. तर गेल्या २४ तासांमध्ये एकूण १७५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशभरात एकूण ४ हजार ७०६ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. मात्र, रुग्ण बरे होण्याच्या संख्येतही वाढ झाली असून ही दिलासादायक बाब आहे. गेल्या २४ तासांमध्ये सुमारे ४ हजार रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या आहे ७१ हजार १०६. तर देशभरात एकूण सक्रिय करोनाबाधित रुग्णांची संख्या आहे सुमारे ९० हजार. महाराष्ट्रात करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे ५९,५४६ वर. या रुग्णांपैकी १,९८२ जणांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर आहे तामिळनाडू राज्य. तामिळनाडूत १९ हजार ३७२ रुग्ण. या रुग्णांपैकी १४५ जणांचा मृत्यू झाला आहे. गुजरातला मागे सारत दिल्ली तिसऱ्या क्रमांकावर पोहोचले आहे. गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत १,०२४ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. दिल्लीत आतापर्यंत १६ हजार २८१ रुग्ण आढळले आहेत. यांपैकी ३१६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, गुजरातमध्ये एकूण रुग्णांची संख्या पोहोचली आहे १५ हजार ५६२ वर. तर, राज्यात ९६० जणांचा मृत्यू झाला आहे. या व्यतिरिक्त, राजस्थानात आतापर्यंत ८ हजारांहून अधिक रुग्ण आढळले आहेत. या रुग्णांपैकी १८० जणांचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशात रुग्णांची संख्या ७,४५३ इतकी झाली असून यांपैकी ३२१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, उत्तर प्रदेशात रुग्णांची संख्या पोहोचली आहे ७,१७० वर. यां पैकी १९७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.