बोनी कपूर यांच्या घरी काम करणारे आणखी २ कर्मचारी करोनाबाधित - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 22, 2020

बोनी कपूर यांच्या घरी काम करणारे आणखी २ कर्मचारी करोनाबाधित

https://ift.tt/3cUGlMi
मुंबईः करोनाचा प्रादुर्भाव देशात वाढत असताना आता कलाकारांच्या घरातही करोनानं शिरकाव केला आहे. तीन दिवसांपूर्वी बॉलिवूड निर्माते यांच्या घरी काम करणाऱ्या कर्मचारी करोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आणखी दोन जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. बोनी कपूर यांच्या घरी काम करणाऱ्या तीन कर्मचारी करोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं आहे. लोखंडवाला कॉम्प्लेक्समधील घरात काम करणाऱ्या कर्माचाऱ्याचा करोना टेस्टचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर घरातील सर्वांची टेस्ट घेण्यात आली होती. या टेस्टमध्ये दोन कर्मचाऱ्यांच्या टेस्ट पॉझिटिव्ह आल्या आहेत. या दोन्ही कर्मचाऱ्यांमध्ये कोणतीही लक्षणं आढळली नव्हती तरीही. दरम्यान, त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. मंगळवारी शेअर केलं होतं पत्रक मंगळवारी बोनी कपूर यांनी एक पत्रक जारी केलं होतं. यात त्यांच्या घरी काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्याला करोनाची लागण झाली असल्याचं म्हटलं होतं. तसंच, माझी मुलं व इतर कर्मचारी सुरक्षित असून आम्ही घरातचं आहोत असं म्हटलं आहे.