
मुंबई- आतापर्यंत आणि त्याची मैत्रीण निती गोएलने शेकडो परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात सुखरूप सोडले. फक्त उत्तर प्रदेशच नाही तर कर्नाटक आणि इतर राज्यातही स्थलांतरीत मजुरांना त्यांच्या घरी सोडले. आता एक पाऊल पुढे टाकत त्याने १७७ मुलींना एर्नाकुलमवरून (केरळ) भुवनेश्वर (ओडिसा) येथे एअरलिफ्ट केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशभरातील लॉकडाउनमुळे मुली एर्नाकुलम येथे अडकल्या होत्या. येथे त्या शिलाई आणि अॅम्ब्रोडरी आर्टीस्ट म्हणून एका फॅक्टरीत काम करायच्या. मात्र करोना व्हायरसमुळे फॅक्टरी बंद झाल्या आणि त्यात लॉकडाउनची घोषणा झाल्यावर कुठे जायचं हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला होता. सोनू सूदला याबद्दल कळल्यानंतर त्या १७७ मुलींना घरी पोहचवण्याची जबाबदारी त्याने स्वतःच्या खांद्यावर घेतली. यासाठी बंगळुरू येथील एअरक्राफ्ट मागवण्यात आले. मुलींना कोची येथून सकाली ८ वाजता एअरलिफ्ट करण्यात आले. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर केवळ आणि केवळ एका अभिनेत्याची चर्चा आहे तो म्हणजे . विरोधातील या युद्धात तो एका योद्ध्याप्रमाणं उतरला आहे. मजूर आणि कामगारांना त्याच्या घरी पोहोचवण्यासाठी दिवस-रात्र एक करतोय. स्वखर्चाने तो मजुरांना त्यांच्या घरी पाठवत आहेत. एवढंच नाही तर प्रवासात त्यांच्या खाण्या- पिण्याची सोयही करत आहे. सोनूने आतापर्यंत हजारो प्रवासी मजूरांना त्यांच्या घरी पाठवले आहे. अजूनही तो अहोरात्र त्यांची मदत करत आहेत. बॉलिवूड जगतातून त्याच्या या कामाचं कौतुक होत असून अनेकांनी आता त्याला मदतीचा हात देऊ केला आहे. जो पर्यंत शेवटचा मजूर त्यांच्या घरी जात नाहीत तो पर्यंत हे काम सुरुच ठेवणार; असा निश्चयच सोनूनं केला आहे. इतकंच नव्हे तर आता तो विद्यार्थ्यांच्या मदतीला देखील धावला आहे. याच त्याच्या उद्दात कार्यामुळे सर्व स्थरावरून त्याचं कौतुक होत आहे.