औरंगाबादमध्ये २४ तासांत ४९ नवे करोनाग्रस्त; एकाचा मृत्यू - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, May 11, 2020

औरंगाबादमध्ये २४ तासांत ४९ नवे करोनाग्रस्त; एकाचा मृत्यू

https://ift.tt/2LfG8XB
औरंगाबाद: औरंगाबादच्या मुकुंदवाडी भागातील रामनगर परिसरात आज एका ८० वर्षीय करोनाबाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान घाटी रुग्णालयामध्ये रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या १४ झाली आहे. तर गेल्या २४ तासांत औरंगाबादमध्ये ४९ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या ५५८वर पोहोचली आहे. रामनगर येथील ८० वर्षीय पुरुष रुग्णाला करोना विषाणूच्या संसर्गाच्या लक्षणांवरून ८ मे रोजी घाटी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. संबंधित रुग्ण हा करोनाबाधित असल्याचे ९ मे रोजीच्या स्वॅब रिपोर्टवरुन स्पष्ट झाले होते. रुग्णाची प्रकृती खालावल्यामुळे त्याला १० मेपासून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. मात्र बायलॅटरल न्यूमोनिया तसेच अॅक्युट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोममुळे संबंधित वृद्धाचा रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनाबाधितांच्या मृत्यूची संख्या ही १४ झाली आहे. दरम्यान, शहर व जिल्ह्यात रविवारी ४९ बाधितांची भर पडली असून, करोनाबाधितांची संख्या ५५८ पर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे केवळ १४ दिवसांत बाधितांची संख्या दहा पटींपेक्षा जास्त वाढली आहे. तसेच रविवारी दिवसभरात ८ बाधित हे करोनामुक्त होऊन उपचाराअंती घरी परतले असून आतापर्यंत ७३जण करोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल सापडलेल्या ४९ करोना रुग्णांच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील लोकांची यादी तयार केली जात आहे. या सर्वांना संपर्कातून करोनाची लागण झाल्याचं सांगण्यात येतं.