सोने-चांदी तेजीत ; प्रमुख शहरात हा आहे आजचा दर - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 8, 2020

सोने-चांदी तेजीत ; प्रमुख शहरात हा आहे आजचा दर

https://ift.tt/37bHih8
मुंबई : जागतिक बाजारात सोन्याच्या दरात शुक्रवारी झालेल्या घसरणींनंतर सोमवारी सोने आणि चांदीमध्ये सोमवारी तेजी दिसून आली. मुंबईत आज सोन्याचा भाव १० ग्रॅमला ४५६४० रुपये आहे. तर चांदीचा भाव ४७४२० रुपये आहे. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोमवारी सोने १६९ रुपयांनी वधारले. सध्या सोन्याचा भाव ४५८६७ रुपये आहे. चांदीच्या दरात ४३९ रुपयांची वाढ झाली असून सध्या चांदीचा भाव प्रती किलो ४७७९० रुपये आहे. 'अनलॉक-१'च्या घोषणेनंतर बाजारपेठा हळुहळू सुरु होत आहेत. त्यामुळे अर्थचक्राला गती मिळाली आहे. दरम्यान, देशातील बहुतांश सराफा बाजार अद्याप बंद आहेत. आज मुंबईत २२ कॅरेट सोने दर ४४६४० रुपये होता. तर २४ कॅरेटसाठी ४५६४० रुपये भाव आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४५०२० रूपये असून २४ कॅरेटसाठी ४६२२० रुपये आहे. कोलकात्यात २४ कॅरेटचा दर ४७१२० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेट सोने ४४२९० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ४८३७० रुपये इतका आहे. आर्थिक वर्ष २०२१साठीच्या सार्वभौम सोनेखरेदीच्या तिसऱ्या मालिकेला आज, सोमवारपासून (८ जून) सुरुवात होणार आहे. त्या अंतर्गत १२ जून २०२०पर्यंत सोन्याच्या रोख्यांमध्ये गुंतवणूक करता येणार आहे. त्या अंतर्गत सोने खरेदीसाठी प्रति ग्रॅम ४,६७७ रुपयांची किंमत निश्चित करण्यात आली आहे. या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करणाऱ्यांना आणि डिजिटल पेमेंट करणाऱ्यांना प्रति ग्रॅम ५० रुपयांची सवलत मिळणार आहे.