काश्मीरमध्ये चार दहशतवादी ठार, चकमक सुरूच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, June 8, 2020

काश्मीरमध्ये चार दहशतवादी ठार, चकमक सुरूच

https://ift.tt/2MFPOf0
काश्मीरः शोपियाँ जिल्ह्यात सुरक्षा दलाचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. यात ४ दहशतवादी ठार झाल्याची माहिती आहे. जम्मू-काश्मीर पोलीस आणि सुरक्षा दलाच्या जवानांच्या संयुक्त पथकाकडून दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यात येतेय. शोपियाँ जिल्ह्यातील पिंजोरा भागात आज पहाटे सुरक्षा दलाचे जवान आणि पोलिसांनी दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम उघडली होती. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार केल्याने चकमक सुरू झाली. या चकमकीत आतापर्यंत ४ दहशतवादी ठार झाले आहेत, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिलीय. गेल्या आठवड्यात काश्मीर खोऱ्यात १५ दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे. यातील बहुतेक दहशतवादी हे हिजबुल मुजाहिद्दीन संघटनेचे होते. सुरक्षा दलांनी २ जूनला त्रालमध्ये दोन दहशतवाद्यांना ठर केलं. त्याच्या दुसऱ्याच दिवशी ३ जूनला पुलवामामधील कंगन येथे ३ दहशतवादी ठार झाले. यात जैश ए मोहमदच्या कमांडरचाही समावेश होता. शोपियाँ जिल्ह्यामध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत रविवारी पाच दहशतवाद्यांचा खात्मा झाला. शोपियाँ येथील रेबन भागामध्ये सकाळपासून सुरक्षा दलांनी शोधमोहीम सुरू केली होती. त्यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला. सुरक्षा दलांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. यात पाच दहशतवाद्यांचा खात्मा झाला. संरक्षण खात्याचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी याबाबत माहिती दिली. ठार झालेल्यांमध्ये 'हिजबूल मुजाहिद्दीन'चा कमांडर फारूक अहमद भट उर्फ नाली याचाही समावेश होता.