नक्षली संबंधाचे आरोप; 'या' कवीसाठी १५ खासदारांचं CM ठाकरेंना पत्रं - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, June 20, 2020

नक्षली संबंधाचे आरोप; 'या' कवीसाठी १५ खासदारांचं CM ठाकरेंना पत्रं

https://ift.tt/37LCH5J
मुंबई: नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप असलेले आणि भीमा-कोरेगाव हिंसेप्रकरणी अटकेत असलेले प्रसिद्ध तेलुगू कवी पी. यांना तुरुंगातून रुग्णालयात दाखल करण्यासाठी देशभरातील विविध पक्षाचे १५ खासदार पुढे सरसावले आहेत. करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि वरवर राव यांची प्रकृती ठिक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करावे, अशी विनंती करणारे पत्र या खासदारांनी मुख्यमंत्री यांना लिहिले आहे. राव यांना सर्वप्रकारच्या वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे. भीमा-कोरेगाव हिंसेप्रकरणी वरवर राव हे न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांच्यासाठी डीएमकेचे खासदार कनिमोझी, आरजेडी खासदार मनोज झा यांच्यासह १५ खासदारांनी हे पत्र लिहिलं आहे. राव हे ८१ वर्षांचे आहेत. त्यांची प्रकृती ठिक नसते. त्यामुळे आम्हाला त्यांच्या आरोग्याची काळजी वाटते. राव यांना गेल्या काही दिवसांपासून उल्टी होत असल्याचं त्यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे. त्यांना अनेकदा बेशुद्धावस्थेतच जेजे रुग्णालयात नेण्यात आलेलं आहे. सध्या करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने त्यांना तुरुंगातून रुग्णालयात शिफ्ट करण्यात यावे, असं या पत्रात म्हटलं आहे. या आधी माजी माहिती आयुक्तानेही वरवर राव यांची तुरुंगातून सुटका करण्याची मागणी केली होती. जोपर्यंत आरोप सिद्ध होत नाहीत, तो पर्यंत आरोपीला निर्दोष मानलं जावं, असा अपराधिक न्यायाचा सिद्धांत आहे. पण राव यांच्या प्रकरणात साक्षीदारच नसल्याने त्यांना तुरुंगातून मुक्त होण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं या माजी माहिती आयुक्तानं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. ३१ डिसेंबर २०१७ रोजी पुण्यातील शनिवारवाड्याच्या प्रांगणात एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. या परिषदेत राव यांनी भाषण दिलं होतं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नगर रस्त्यावरील कोरेगाव भीमा येथे हिंसाचार उसळला होता. त्यामुळे राव यांचा नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप करून त्यांना अटक करण्यात आली होती. या घटनेप्रकरणी वरवर राव (हैदराबाद) यांच्यासह अरुण परेरा (ठाणे), गौतम नवलाखा (दिल्ली), सुधा भारद्वाज (फरिदाबाद, हरियाणा) आणि वर्नोन गोन्साल्विस (मुंबई) यांनाही अटक करण्यात आलेली आहे. या घटनेप्रकरणी संशयित आरोपींच्या ईमेल्सची पडताळणी करतानाच एकाच वेळी मुंबई, रांची, हैदराबाद, मुंबई, ठाणे, फरिदाबाद येथे छापे मारण्यात आले होते. अटक केलेले सर्वजण माओवादी संघटनेशी संबंधित असून वरिष्ठ माओवादी नेत्यांशी संपर्कात असल्याचे समोर आले होते.