बिहारमध्ये देशातील पहिली डिजिटल निवडणूक; फडणवीस लागले कामाला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 23, 2020

बिहारमध्ये देशातील पहिली डिजिटल निवडणूक; फडणवीस लागले कामाला

https://ift.tt/3gqQ3GV
मुंबई: करोना संसर्गामुळे सर्वच गणितं बिघडली आहेत. देशातील निवडणुकांवरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे बिहारच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचारही डिजिटल पद्धतीने होणार असून बिहारची निवडणूक ही देशातील पहिली ठरणार आहे. भाजपचे बिहार निवडणुकीचे प्रभारी म्हणून यांनी या निवडणुकीच्या प्रत्यक्षकामात भाग घेतला असून बिहार प्रदेश कार्यकारिणीशी ऑनलाइन संवाद साधला आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते आणि भाजपचे बिहार निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी बिहारच्या भाजप प्रदेश कार्यकारणीशी संवाद साधला. बिहारची निवडणूक ही पहिली डिजिटल निवडणूक आहे. या निवडणुकीचा प्रचारही डिजिटलच होणार आहे, त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांशी डिजिटल माध्यमातून संवाद साधा. सोशल मीडियाचा अधिकाधिक वापर करून मतदारांच्या समस्या जाणून घेतानाच भाजपचे कार्यही त्यांच्यापर्यंत पोहोचवा, अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. नव्या भारताच्या निर्मितीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अविरत मेहनत घेत आहेत. बिहारनेही मोदींना नेहमीच साथ दिली आहे. त्यामुळे या निवडणुकीतही बिहारची जनता भाजपच्यामागे उभी राह्यला हवी, असं फडणवीस म्हणाले. बिहारमध्ये सर्वाधिक तरुण आहेत. या तरुणांपर्यंत सोशल मीडियाच्यामाध्यमातून पोहोचण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या. ही केवळ डिजिटल माध्यमातून होणारी निवडणूक नाही. तर बिहारचा भाग्योदय निश्चित करणारी निवडणूक आहे. बिहारचा नवा इतिहास लिहिणारी ही निवडणूक आहे. कितीही संकट आलं, कितीही वादळं आली तरी भाजपचा रथ कोणी रोखू शकलेला नाही. जेव्हा जेव्हा लोकशाहीवर आक्रमणं झाली तेव्हा तेव्हा सर्वात आधी बिहारमधूनच त्याविरोधात पहिला आवाज उमटला. बिहारमधूनच मोठी लढाई लढली गेली, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी बिहार भाजपचे प्रदेशाध्यक्ष संजय जयसवाल यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. दरम्यान, येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बिहार विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. सप्टेंबरमध्ये निवडणुकीची अधिसूचना निघण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे. बिहारमध्ये २४३ जागांसाठी निवडणुका होत आहे. बसपाने ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. तर मुख्यमंत्री नितीश कुमार हे भाजपसोबत युती करण्याची शक्यता आहे. तसेच राष्ट्रीय जनता दलाची काँग्रेससोबत आघाडी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.