नवी दिल्ली/मुंबई: बॉलिवूड अभिनेता मृत्यू प्रकरणी सीबीआयचं पथक गेल्या तीन दिवसांपासून चौकशी करत आहे. आतापर्यंत सीबीआयने हाउसकीपर नीरज, मित्र सिद्धार्थ पिठानी आणि दीपेश सावंत यांचे पुन्हा जबाब नोंदवून घेतले आहेत. आज, रविवारी सीबीआयचे अधिकारी हिची चौकशी करण्याची शक्यता आहे. सीबीआयचे पथक काल, शनिवारी सुशांतसिंहच्या वांद्रे येथील घरी चौकशीसाठी गेले होते. तिथे त्यांनी क्राइम सीन री-क्रीएट केला होता. त्याचवेळी १४ जून रोजी सुशांतच्या मृत्यू झाला त्या दिवशी घरात उपस्थित असलेला हाउसकीपर नीरज, सिद्धार्थ आणि दीपेश सावंत यांचे जबाब नोंदवून घेतले. या प्रकरणात रिया चक्रवर्ती ही मुख्य संशयित आरोपी आहे. सुशांतच्या मृत्यूनंतर त्याचे वडील के. के. सिंह यांनी पाटणा येथे रियाच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. सुशांतच्या मृत्यूला जबाबदार ठरवण्यासह पैशांची अफरातफर आदींसह अनेक आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. आतापर्यंत अंमलबजावणी संचालनालयाने मनी लाँड्र्र्रिंग प्रकरणात अनेकदा रियाची चौकशी केली आहे. रिया व्यतिरिक्त तिचा भाऊ शोविक, वडील इंद्रजित आणि सुशांतच्या बिझनेस मॅनेजर श्रुती मोदी यांचेही जबाब नोंदवून घेतलेले आहेत. दुसरीकडे शोविक आणि रियाने दिलेल्या उत्तरांनी ईडीचे समाधान झालेले नाही. रियाने आपले उत्पन्न आणि खर्चाचा तपशील योग्यरित्या मांडलेला नाही, असे कळते. नीरज, सिद्धार्थ आणि दीपेश यांचे जबाब नोंदवून घेतल्यानंतर रविवारी सीबीआय रियाची चौकशी करण्याची शक्यता आहे. महेश भट्ट आणि रिया चक्रवर्ती यांच्यातील व्हॉट्सअॅप संवादावरून नवे वादळ उठले आहे. यावरून दोघांनाही टीकेला सामोरे जावे लागले होते. सुशांतचे घर सोडल्यानंतर रियाने भट्ट यांना मेसेज केले होते. याशिवाय रुग्णालयाच्या शवागारात रिया चक्रवर्ती गेली होती. त्यावेळी तिने जे शब्द उच्चारले होते, त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे त्यासंबंधी प्रश्न विचारले जाण्याची शक्यता आहे.