लिस्बन: पत्नीने घटस्फोट दिल्याने नाराज झालेल्या पतीने संतापाच्या भरात तलवारीने तिच्या प्रियकराचे गुप्तांगच कापले. यात त्याचा मृत्यू झाला. ही घटना पत्नीच्या डोळ्यांसमोरच घडली. ही घटना पाहता यावी, यासाठी त्याने तिला केबलने बांधून ठेवले होते. पोर्तुगालमधील एका गावात ही धक्कादायक आणि तितकीच भयानक घटना घडली. या प्रकरणी आरोपीचा शोध घेतला जात असतानाच, त्यानेही या हत्याकांडानंतर आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. तत्पूर्वी, घटस्फोटित पत्नीच्या प्रियकराची हत्या केल्यानंतर आरोपी फरार झाला होता. घटनेनंतर काही वेळाने पत्नीने कशीबशी सुटका करून घेतली. स्पानइआर्ड कार्लोस सांडे फिडल्गो असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला होता. त्यानेही एका पुलावरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेचा पोलीस तपास करत आहेत. फिडल्गोचा मृतदेह सापडला आहे. तो व्यावसायिक होता. त्याचे पत्नीसोबत पटत नव्हते. स्थानिक मीडियातील रिपोर्ट्सनुसार, घटस्फोटित पत्नीला त्याने बांधून ठेवले होते. त्यानंतर तिच्या प्रियकराचे गुप्तांग कापले. यात त्याचा मृत्यू झाला. पत्नी कुठे जाते याची माहिती व्हावी यासाठी आरोपीने तिच्या कारमध्ये जीपीएस ट्रॅकर बसवला होता, अशी माहिती मिळते.