लखनऊ: उत्तर प्रदेशात गुन्ह्यांच्या घटना वाढत आहेत. राज्याची राजधानी लखनऊमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आदल्या दिवशी बेपत्ता झालेल्या १२ वर्षांच्या मुलीचा सापडला आहे. पोलीस चौकीपासून काही अंतरावरच तिचा मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. तिच्यावर केल्यानंतर केली असावी, असा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लखनऊमध्ये पोलीस चौकीपासून काही अंतरावरच १२ वर्षीय मुलीचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तिथे पोहोचले. त्यांनी मुलीचा मृतदेह चादरीत गुंडाळला आणि विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. मुलीवर अत्याचार केल्यानंतर तिची हत्या केल्याचा संशय तिच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. तिच्या शवविच्छेदनाचा अहवाल अद्याप यायचा आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. लखनऊच्या पारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहान चौकीजवळच मुलीचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मुलीची ओळख पटवण्यात आली. ती मुलगी एक दिवस आधीच बेपत्ता झाली होती. सरोषा गावात ती राहत होती. तिचा शोध घेण्यात येत होता. पोलीस आयुक्त वर्मा यांनी सांगितले की, किशोरवयीन मुलगी बेपत्ता होती. एका नाल्याच्या काठावर तिचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठवला. त्याचा अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येईल.